जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चुकीची डोअरबेल वाजवल्याने कृष्णवर्णीय मुलावर झाडल्या दोन गोळ्या, प्रकृती सुधारताच मिळालं व्हाईट हाऊसमध्ये येण्याचं निमंत्रण

चुकीची डोअरबेल वाजवल्याने कृष्णवर्णीय मुलावर झाडल्या दोन गोळ्या, प्रकृती सुधारताच मिळालं व्हाईट हाऊसमध्ये येण्याचं निमंत्रण

चुकीची डोअरबेल वाजवल्यानंतर दोन गोळ्या झाडल्या गेलेल्या एका कृष्णवर्णीय किशोरवयीन मुलाला व्हाईट हाऊसमध्ये येण्याचं आमंत्रण

चुकीची डोअरबेल वाजवल्यानंतर दोन गोळ्या झाडल्या गेलेल्या एका कृष्णवर्णीय किशोरवयीन मुलाला व्हाईट हाऊसमध्ये येण्याचं आमंत्रण

चुकीची डोअरबेल वाजवल्यानंतर दोन गोळ्या झाडल्या गेलेल्या एका कृष्णवर्णीय किशोरवयीन मुलाला व्हाईट हाऊसमध्ये येण्याचं आमंत्रण मिळालं आहे.

  • -MIN READ Trending Desk Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 19 एप्रिल- चुकीची डोअरबेल वाजवल्यानंतर दोन गोळ्या झाडल्या गेलेल्या एका कृष्णवर्णीय किशोरवयीन मुलाला व्हाईट हाऊसमध्ये येण्याचं आमंत्रण मिळालं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी मंगळवारी या तरुणाला बरा झाल्यानंतर आपल्या निवासस्थानी बोलवलं आहे. या मुलावरील हल्ल्याच्या प्रकरणातील संशयित शूटर असलेल्या वृद्ध अमेरिकन व्यक्तीनं पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.राल्फ यार्ल, असं जखमी झालेल्या किशोरवयीन मुलाचं नाव आहे. गुरुवारी रात्री आपल्या जुळ्या भावांना घेण्यासाठी गेलेल्या राल्फनं चुकून आरोपीच्या घराची बेल वाजवली होती. संतप्त झालेल्या व्यक्तीनं राल्फवर बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या डोक्याला लागली आहे. ही घटना मिसुरी राज्यामध्ये घडली आहे.बायडेन यांनी या घटनेची निंदा केली आहे. ते म्हणाले की, युनायटेड स्टेट्स व्यापक गन व्हॉयलन्सचा सामना करण्यात अपयशी ठरत असल्याचं हे आणखी एक उदाहरण आहे. या घटनेनंतर बायडेन यांनी ट्विट केलं आहे. “आपल्या मुलानं चुकीच्या घराची बेल वाजवल्यानंतर त्याला गोळी मारली जाईल, अशी चिंता पालकांनी करू नये. आपल्याला गन व्हॉयलन्सच्या विरोधात लढा सुरू ठेवायचा आहे. मी रात्री राल्फ आणि त्याच्या कुटुंबाशी बोललो आहे. राल्फ तुला बरं वाटल्यावर आपण ओव्हलमध्ये (व्हाईट हाऊसमधील मीटिंग रूम) भेटू,” असं ट्विट बायडेन यांनी केलं. 84 वर्षाचे अँड्र्यू लेस्टर या घटनेतील आरोपी आहेत. त्यांच्यावर सोमवारी प्रथम श्रेणीमध्ये प्राणघातक हल्ला आणि सशस्त्र गुन्हेगारी कारवाईचा आरोप ठेवण्यात आला आहे, असं स्थानिक प्रॉसिक्युटर झॅकरी थॉम्पसन यांनी सांगितलं.क्ले काउंटी शेरीफ विभागाच्या प्रवक्त्यानं एएफपीला सांगितलं की, लेस्टर हे मंगळवारी स्वत: पोलिसांसमोर हजर झाले. लेस्टर यांनी न्यायालयात सांगितलं, “हा किशोरवयीन मुलगा घरात चोरी करण्याच्या उद्देशानं घुसण्याचा प्रयत्न करत आहे, असा आपला समज झाल्यानं आपण काचेच्या दारातून त्याला गोळ्या घातल्या.” लेस्टर यांना 200,000 डॉलर्स दंडाच्या बदल्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे.24 तासांच्या कोठडीनंतर कोणत्याही आरोपाशिवाय लेस्टरला सोडण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. (हे वाचा: बायको नव्हे सायको, मुलांना खाऊ घातले नवऱ्याचे मांस, तर कुठे तळले प्रायव्हेट पार्ट, PHOTOS ) कॅन्सस शहराचे महापौर क्विंटन लुकास यांनी मंगळवारी सीएनएनला सांगितलं की, वर्णभेद हा या संपूर्ण परिस्थितीचा भाग नसल्याची बतावणी करणं म्हणजे जाणीवपूर्वक प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे. हा मुलगा कृष्णवर्णीय असल्यामुळेच त्याच्यावर हल्ला झाला आहे.राल्फ यार्लला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे आणि तो घरी आराम करत असल्याची माहिती त्याची आई क्लियो नागबे यांनी मंगळवारी सीबीएसला दिली. “त्यानं जाऊन दारावरची बेल वाजवली. तो घरात जाणार नव्हता. त्याचे जुळे भाऊ त्याच्यासोबत गाडीत बसून घरी येणार होते. मात्र, बेल वाजवल्यानंतर भावंड बाहेर पळत येण्याऐवजी दोन गोळ्या राल्फच्या दिशेनं आल्या,” असं नागबे म्हणाल्या. 400 मिलियन गन्स यार्लची मावशी फेथ स्पूनमूर, GoFundMe कॅम्पेनदरम्यान म्हणाली की, तिचा भाचा एक हुशार विद्यार्थी आहे. केमिकल इंजिनीअर होण्याचं त्याचं स्वप्न आहे. फंड रेझरच्या माध्यमातून मंगळवारी दुपारपर्यंत राल्फ यार्लसाठी जवळपास 3 दशलक्ष डॉलर्स जमा झाले होते.अंदाजे 330 दशलक्ष लोकसंख्येच्या युनायटेड स्टेट्समध्ये अंदाजे 400 दशलक्ष बंदुका आहेत. त्यामुळे तिथे नियमितपणे प्राणघातक गोळीबाराच्या घटना घडतात. मात्र, अमेरिकेला आफ्रिकन-अमेरिकन लोकांविरुद्धच्या हिंसाचाराच्या घटनांचा दीर्घ इतिहास असल्यानं आणि अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरत असल्यानं राल्फ यार्लच्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    कॅन्सस शहराचे पोलीस प्रमुख स्टेसी ग्रेव्ह्स यांनी रविवारी रात्री पत्रकार परिषदेत सांगितलं की, प्राथमिक माहितीवरून असं लक्षात येतं की या घटनेला वर्णभेदाची पार्श्वभूमी नाही. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. “पोलीस प्रमुख म्हणून मी या प्रकरणाचं गांभीर्य जाणते. आफ्रिकन-अमेरिकन समाजाच्या काळजीची मला जाणीव आहे,” असं स्टेसी ग्रेव्ह्स म्हणाल्या. सोमवारी अशाच एका प्रकरणी न्यूयॉर्क राज्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिथे एका 20 वर्षीय मुलीला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारण्यात आलं आहे. न्यूयॉर्क पोलिसांनी सांगितलं की, शनिवारी रात्री केलिन गिलिस नावाच्या मुलीला एका घरमालकानं गोळ्या घातल्या. इतर तिघांसोबत असलेली गिलिस आपल्या मित्राचं घर शोधण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी चुकीच्या पत्त्यावर पोहचल्यानंतर तिच्यावर आरोपी घर मालकानं हल्ला केला.वॉशिंग्टन काउंटीचे शेरीफ (अमेरिकन खेड्यातील न्यायाधिकारी) जेफ्री मर्फी म्हणाले, आपण चुकीच्या घरी आलो असल्याची जाणीव झाल्यानंतर केलिन आणि तिचे मित्र तिथून निघून जात होते. मात्र, काही कारणास्तव घर मालक आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. संतापलेल्या घर मालकानं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी केलिनला लागली.केविन मोनाहन असं गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो 65 वर्षांचा आहे. सोमवारी त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर सेकंड-डिग्री हत्येचा आरोप ठेवण्यात आला.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात