क्राईमची दुनिया ही खूपच वाईट आणि तितकीच इन्ट्रस्टिंग आहे. तुम्ही क्राईम पेट्रोल, सीआयडी सारख्या सिरीज पाहिल्या असतील, ज्यामध्ये हे क्राईम करणारे लोक इतके हुशार असतात की, ते आपण या प्रकरणात फसले जाऊ नये यासाठी असं काही डोक लावतात की पोलिसही चक्रावून जातात. हे तुम्ही पाहिले असेल. पण असं असलं तरी देखील चोर किंवा गुन्हेगार कितीही हुशार का असेना, तो एक तरी पुरावा नक्कीच सोडून जातो आणि तो पुरावा जर पोलिसांच्या हाती लागला, तर त्या गुन्हेगाराचा पर्दाफाश होण्यासाठी वेळ लागत नाही.
बऱ्याच प्रकरणात घरच्याच किंवा जवळच्याच व्यक्तीने घात केल्याचं समोर आलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 धोकादायक बायकांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्याच नवऱ्याची हत्या केली. तसेच त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
पहिली आणि धक्कादायक घटना दोन वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये घडली. या महिलेनं रागात आपल्या नवऱ्याची हत्या केली होती. महिलेने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापून तेलात तळला होता. महिलेच्या वकिलाने सांगितले की, तिने स्वत:च्या बचावासाठी नवऱ्याची हत्या केली, परंतु नवऱ्याच्या बहिणीने सांगितले की, तिचा भाऊ लग्न झालेला असून देखील तिच्या वहिनीचा विश्वास घात करत होता, ज्यामुळे तिने त्याची हत्या केली.
दुसऱ्या महिलेने तर आणखी धोकादायक काम केले होते. कॅथरीन नाइट नावाच्या ऑस्ट्रेलियन महिलेने आपल्या पतीची हत्या केली आणि त्याचे तुकडे शिजवले आणि नंतर ते आपल्याच मुलांना खायला दिले. 2000 साली घडलेल्या या घटनेत महिलेने पतीवर चाकूने 37 वार केले होते. मग तिने नवर्याचे डोके कुकरमध्ये शिजवून मुलांना दिले, पण ती हे करत असतानाच पोलिसांनी येऊन तिला अटक केली.
ज्युडी ब्युनोआनो नावाची अमेरिकन महिला ही सीरियल किलर होती जिने तिच्या पतीला आर्सेनिक देऊन मारले. आश्चर्याची बाब म्हणजे, तिने आधी तिच्या मुलाला आणि नंतर तिच्या प्रियकराला आर्सेनिक देऊन मारले. त्यानंतर या महिलेला इलेक्ट्रिक खुर्चीवर बसून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
कॅलिफोर्नियामधील रहिवासी असलेल्या ओमामा नेल्सनवर आरोप आहे की तिने तिच्या 56 वर्षीय पतीची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह शिजवून खाल्ला. महिलेला 1993 मध्ये अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर पॅरोलशिवाय तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यावेळी ती 23 वर्षांची होती. 2011 मध्ये तिने पुन्हा पॅरोलसाठी अर्ज केला, परंतु त्यानंतर तिला पुढील 15 वर्षे म्हणजे 2026 पर्यंत पॅरोल मिळू शकणार नाही असे सुनावले गेले.
गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये केरळमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली होती. एक व्यक्ती आणि एका जोडप्यानं दोन महिलांची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे खाल्ल्याचा आरोप आहे. या कहानीत बायकोने आपल्या नवऱ्याची हत्या नाही केली, पण तिने हत्या मात्र नक्कीच केली.