जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बिअर प्यायल्याशिवाय लागत नाही 'किक', कुठली आहे ही बाईक? वाचा प्रकार काय?

बिअर प्यायल्याशिवाय लागत नाही 'किक', कुठली आहे ही बाईक? वाचा प्रकार काय?

फोटो क्रेडिट - Youtube/@kytherocketman

फोटो क्रेडिट - Youtube/@kytherocketman

या विकसित केलेल्या बाइकला कोणत्याही प्रकारचं पारंपरिक इंधन लागत नाही.

  • -MIN READ Trending Desk International
  • Last Updated :

    बाइक चालवणं हा अनेकांचा छंद असतो. सध्याच्या काळात मात्र हा छंद अनेकांना परवडेनासा झाला आहे. कारण बाइक्सच्या किमती तर वाढतच आहे; पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बाइक्स चालवण्यासाठी लागणाऱ्या इंधनांचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल, डिझेल किंवा गॅस अशा सर्वच प्रकारच्या इंधनांचे दर वाढत आहेत; मात्र अमेरिकेतल्या एका युवकाने आपल्या बाइकप्रेमाचा खर्च कमी करण्यासाठी एक अफलातून युक्ती शोधून काढली आहे. त्याने विकसित केलेल्या बाइकला कोणत्याही प्रकारचं पारंपरिक इंधन लागत नाही. कोणी विचारही केला नसेल, अशा प्रकारच्या इंधनावर त्याची बाइक चालते. त्याचं मायलेजही चांगलं आहे. त्या युवकाने चक्क बीअरवर चालणारी बाइक विकसित केली आहे. त्याच्या शोधाविषयी अधिक जाणून घेऊ या. ‘झी न्यूज हिंदी’ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    मायकलसन नावाचा हा युवक अमेरिकेच्या मिशिगन शहरात राहतो. इतर अनेक युवकांप्रमाणे तो बाइकप्रेमी आहे आणि सातत्याने नवनव्या बाइक्स खरेदी करत राहतो; मात्र इंधनांच्या वाढत्या दरांनी त्यालाही विचार करणं भाग पडलं. म्हणूनच त्याने एक अत्यंत वेगळा विचार केला. अनेकांची आवडती असलेली बीअर इंधन म्हणून वापरता येऊ शकेल असा तो विचार होता आणि त्यावर त्याने प्रयोग केला. महत्त्वाचं म्हणजे त्याला स्वतःला बीअर आवडत नाही. किंबहुना आपण ‘ड्रिंकर’ नाही असं तो सांगतो. तसंच, म्हणूनच कदाचित बीअरचा असा वापर करता येऊ शकेल असा विचार आपण केला असावा, असंही तो सांगतो. त्याच्या या प्रयोगाने सगळेजण आश्चर्यचकित झाले आहेत. अर्थात हे केवळ प्रायोगिक पातळीवर नाही. बीअरवरची ही बाइक ताशी 150 मैल वेगाने धावू शकते. मायकलसनने आपल्या गॅरेजमध्येच ही बाइक तयार केली आहे. त्याचे बाइकबरोबरचे काही फोटोज आता व्हायरल झाले आहेत. त्याचं असं म्हणणं आहे, की ही बाइक पर्यावरणाच्या दृष्टीने, तसंच परवडण्याच्या दृष्टीनेही किफायतशीर आहे. ही बाइक रेडबुल, तसंच कारिबू कॉफीवरही चालू शकते. एका इंटरव्ह्यूत मायकलसनने या बाइकच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली. त्यानुसार, त्या बाइकच्या इंजिनच्या रूपात 14 गॅलन केगसह हीटिंग कॉइल आहे. ही कॉइल बीअरला 300 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तापवते. त्यामुळे नोझलमध्ये सुपर-हीट स्टीम तयार होते. मायकलसनच्या या क्रिएटिव्ह प्रयोगाला दाद मिळत आहे. सर्वांनाच या ‘बीअर पिणाऱ्या’ बाइकबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: bike
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात