जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: भीषण वादळात कारमध्ये अडकलं जोडपं, सुटण्यासाठी जिवाच्या आकांताने धडपड, अखेर..

VIDEO: भीषण वादळात कारमध्ये अडकलं जोडपं, सुटण्यासाठी जिवाच्या आकांताने धडपड, अखेर..

VIDEO: भीषण वादळात कारमध्ये अडकलं जोडपं, सुटण्यासाठी जिवाच्या आकांताने धडपड, अखेर..

स्टेफनी कोचरन आणि तिचा पती मार्क दक्षिण कॅरोलिना येथील अॅलेडली काउंटीमध्ये त्यांच्या घराकडे जात होते. ते पिकअप ट्रकमधून निघाले होते. त्यामध्ये असलेल्या कॅमेऱ्यात त्यांचा संपूर्ण प्रवास रेकॉर्ड होत होता वारा इतका जोरात होता की, त्यांचा ट्रकही डळमळताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 10 एप्रिल : मोठ्या वादळात अडकणं किती भयावह आणि आव्हानात्मक असू शकतं, हे वादळात सापडलेलीच एखादी व्यक्ती सांगू शकेल. वादळात गाडी चालवणंसुद्धा खूप धोकादायक असतं. असाच प्रकार एका जोडप्यासोबत (Couple stuck in tornado viral video) घडला. अचानकपणे या वादळात सापडल्यानंतर त्यांनी जीवाची बाजी लावत त्यातून कशीबशी सुटका करून घेतली. याचा व्हिडिओ त्यांनी बनवला असून त्यातून या वादळाची भीषणता लक्षात येत आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, स्टेफनी कोचरन (Stephanie Cochran) आणि तिचा पती मार्क दक्षिण कॅरोलिना येथील अॅलेडली काउंटीमध्ये त्यांच्या घराकडे जात होते. ते पिकअप ट्रकमधून निघाले होते. त्यामध्ये असलेल्या कॅमेऱ्यात त्यांचा संपूर्ण प्रवास रेकॉर्ड होत होता वारा इतका जोरात होता की, त्यांचा ट्रकही डळमळताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. याशिवाय त्यांच्या वाहनासमोर एक हवेचा उंच भोवरा दिसत आहे.

वादळातून कसे-बसे बाहेर पडले व्हिडिओमध्ये स्टेफनी आपल्या पतीला वाहन फार काळजीपूर्वक चालवण्याचा सल्ला देताना दिसत आहे. या बिकट परिस्थितीतून हे जोडपे बाहेर येताच ते खूप खूश होऊन हसायला लागतात. या कठीण परिस्थितीत आई-वडील कसे अडकले, हे या दाम्पत्याच्या मुलानं सांगितलं. ते दोघे त्यांच्या ऑफिसमधून घरी परतत असताना अचानक वादळ आलं. एवढं मोठं वादळ येऊ शकतं, याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती. त्याक्षणी त्यांच्याकडे मोबाईल फोन सेवाही सुरू नव्हती आणि रेडिओही काम करत नव्हता. देवानंच आमचा जीव वाचवला या जोडप्यानं WLTX ला सांगितलं की, ते मॅथिस फार्म्स जवळ महामार्गावर गाडी चालवत असताना त्यांना वादळ दिसलं. त्या भागात वादळ येत असल्याचं त्यांनी यापूर्वी ऐकलं होतं. पण त्याच्या फोनमध्ये नेटवर्क नव्हतं. त्यामुळे त्यांची बहीणही त्यांना वादळ येत असल्याची माहिती देऊ शकली नाही. ती महिला म्हणाली, “आम्ही फक्त देवावर अवलंबून होतो. तो आम्हाला मार्ग दाखवणार होता आणि त्यानेच आम्हाला सुरक्षित ठेवलं. ते म्हणाले, ‘आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या कारची फक्त विंडशील्ड तुटली.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cyclone , storm
  • First Published :
जाहिरात
जाहिरात