जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आपण कचऱ्यात फेकतो त्याचीच Amazon वर हजाराला विक्री! वस्तू पाहून व्हाल हैराण!

आपण कचऱ्यात फेकतो त्याचीच Amazon वर हजाराला विक्री! वस्तू पाहून व्हाल हैराण!

आपण कचऱ्यात फेकतो त्याचीच Amazon वर हजाराला विक्री! वस्तू पाहून व्हाल हैराण!

ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात छोट्यात छोट्यापासून ते मोठ्या वस्तू घर बसल्या मागवल्या जात आहेत. याच कारणामुळे अनेकवेळा काही वस्तू मोठ्या किंमतीवर विकल्या जात आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 जानेवारी : ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात छोट्यात छोट्यापासून ते मोठ्या वस्तू घर बसल्या मागवल्या जात आहेत. याच कारणामुळे अनेकवेळा काही वस्तू मोठ्या किंमतीवर विकल्या जात आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांचा नफाही या वाढलेल्या किंमतीचं प्रमुख कारण ठरतो. सोशल मीडियावर ऍमेझॉनवर विकल्या जाणाऱ्या अशाच एका वस्तूचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. एका इन्स्टाग्राम यूजरने त्याच्या अकाऊंटवर स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामुळे अनेकांना विचार करायला भाग पाडलं आहे. बाजारातून आपण नारळ घरी आणतो तेव्हा त्याची करवंटी कचऱ्यामध्ये फेकली जाते, पण हा स्क्रीनशॉट बघितल्यानंतर तुम्हाला आपण करवंटी कचऱ्यात का फेकतो? याचा पस्तावा होईल. नारळाचा वापर करून राहिलेली करवंटी तुमच्या कमाईचं साधन बनू शकते. ऍमेझॉनवर नारळाची करवंटी विकली जात असल्याचा फोटो या इन्स्टाग्राम यूजरने शेअर केला आहे. आपल्याला याबद्दल माहिती नव्हती, नाहीतर मी आज करोडपती झालो असतो, असं कॅप्शन या यजूरने दिलं आहे.

जाहिरात

या पोस्टमध्ये ऍमेझॉन नारळाची अर्धी करवंटी 1,365 रुपयांना विकत आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे ही किंमत डिस्काऊंटनंतरची आहे, नाहीतर याच करवंटीची किंमत 3 हजार रुपये दाखवण्यात आली आहे. यूजरची ही पोस्ट बघून अनेकांना आश्चर्यही वाटलं, पण काहींनी या करवंटीचे फायदेही सांगितले. या करवंटीमध्ये खाणं शिजवलं जाऊ शकतं, कुंडी किंवा बर्ड फीडर म्हणूनही याचा वापर केला जाऊ शकतो, अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: amazon
  • First Published :
जाहिरात
जाहिरात