जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सायकल रेसचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO; एकाचा तोल जाताच घडलं अनपेक्षित

सायकल रेसचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO; एकाचा तोल जाताच घडलं अनपेक्षित

सायकल रेसचा कधीही पाहिला नसेल असा VIDEO; एकाचा तोल जाताच घडलं अनपेक्षित

शर्यतीत पुढे जाण्याच्या प्रयत्नात एकापाठोपाठ सगळेच सहभागी स्पर्धक खाली कोसळू लागतात. खरं तर, ही एक सायकल शर्यत (Cycle Race Funny Video) आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 20 मार्च : जगात विविध प्रकारच्या शर्यती आहेत. पायी ते सायकल आणि कार रेस अशा अनेक शर्यती होतात. तुम्हीही कुठल्या ना कुठल्या रेस बघितल्या असतील. अनेकदा शर्यतीत वाहने पळवण्याची स्पर्धा असते. या शर्यतीत सगळ्यांनाच आघाडीवर राहायचं असतं. यासाठी लोक भरपूर कष्ट घेतात. मात्र, कधी-कधी शर्यतीत पुढे जाण्याच्या नादात अशा काही घटना घडतात, ज्या पाहून सगळ्यांनाच हसू येतं. \ VIDEO: 2 बैलांच्या लढाईदरम्यान मध्येच कुत्र्याची एन्ट्री; पुढे जे घडलं ते बघाच एक असाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शर्यतीत पुढे जाण्याच्या प्रयत्नात एकापाठोपाठ सगळेच सहभागी स्पर्धक खाली कोसळू लागतात. खरं तर, ही एक सायकल शर्यत (Cycle Race Funny Video) आहे आणि या शर्यतीची सुरूवात पाहूनच तुम्हाला हसू येईल.

जाहिरात

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता झेंडा दाखवताच सायकल रेसला सुरुवात होते. पण शर्यत सुरू होताच अचानक 2-3 खेळाडू सायकलसोबतच खाली कोसळतात. त्यानंतर जे दृश्य पाहायला मिळतं ते थक्क करणारं आहे. समोरच्या सायकल कोसळल्यानंतर जे खेळाडू मागून सायकल घेऊन वेगाने येत असतात त्यांना त्यांच्या सायकलचा समतोल साधता येत नाही आणि ते एकामागून एक तिथेच कोसळू लागतात. स्विमिंग पुलमध्ये कोसळलेल्या श्वानाला वाचवायला गेला मालक; पाय घसरला अन्.., VIDEO हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर frangosdacolina या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 8 लाख 66 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 17 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ही मजेशीर शर्यत पाहून सगळेच खळखळून हसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात