मुंबई 04 जानेवारी : कुत्रा हा माणसाचा सर्वांत चांगला मित्र मानला जातो. कुत्रा अन्य प्राण्यांच्या तुलनेत आपल्या मालकाप्रति जास्त प्रामाणिक असतो. कुत्रा आपल्या मालकावर खूप प्रेम करतो. काही वेळा तर तितकं प्रेम त्याला त्याच्या मालकाकडून मिळतं असंही नाही. मालकाचा जीव धोक्यात असला, तर कुत्रा तो धोका आपल्या अंगावर घेतो. अलीकडेच एका पाळीव कुत्र्याने सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मालकाचा जीव वाचवला. ही व्यक्ती सापडल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयातून सोडेपर्यंत त्याचा पाळीव कुत्रा रुग्णालयाच्या दारात बसून होता. ही बातमी वाचल्यावर प्राण्यांचं प्रेम खूप उत्कट आणि सर्वोच्च असतं, याची पुन्हा एकदा खात्री पटेल.
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी मेक्सिकोत एक आश्चर्यजनक घटना घडली. तिथल्या सोनोरा राज्यात 84 वर्षांचे ग्रेगोरियो रोमेरो वास्तव्य करतात. त्यांच्याकडे एल पालोमो नावाचा पाळीव कुत्रा आहे.
ना Hight पाहिली ना weight पाणघोड्यावर चढली थेट, पुढे सिंहिणंचं काय झालं तुम्हीच पाहा Video
गेल्या वर्षी 27 नोव्हेंबरला ग्रेगोरिया फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले. परंतु, ते घरी परतले नाहीत. ते अनेकदा घरातून अशाच पद्धतीने बाहेर जात आणि एक-दोन दिवसांत घरी परतत असत. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत काळजी वाटली नाही. या वेळी चार दिवस उलटूनही ते घरी परतले नाहीत म्हणून त्यांची भाची रमोनाने पोलिसांत तक्रार दाखल केली.
खूप शोध घेऊनही लागला नाही सुगावा
पोलिसांनी त्या व्यक्तीच्या घराजवळ शोध घेतला; मात्र तिथे त्यांना या व्यक्तीचा कोणताही सुगावा लागला नाही. तेव्हा त्यांचा पाळीव कुत्रा मदतीला धावून आला आणि त्याने ग्रेगोरिया यांचे प्राण वाचवले.
मेक्सिकन नॅशनल गार्ड, म्युनिसिपल पोलीस, म्युनिसिपल सिव्हिल प्रोटेक्शन युनिट आणि स्नायपर डॉग्जनादेखील ग्रेगोरिया यांच्या शोधासाठी पाचारण करण्यात आलं होतं. त्यांनी घराभोवती शोध घेतला; पण त्यात यश आलं नाही; मात्र त्या वेळी एल पालोमे हा कुत्रा मदतीसाठी धावून आला.
कुत्र्याने बचाव पथकाला पोहोचवलं हरवलेल्या व्यक्तीपर्यंत
हा कुत्रा बचाव पथकाला सोबत घेऊन डोंगरावर आणि दरीच्या दिशेने घेऊन गेला, जिथे ही व्यक्ती रस्ता चुकली होती. ही व्यक्ती रस्ता चुकल्याने वाळवंटात गेली होती. ग्रेगोरिया यांना स्मृतिभ्रंश झाला होता. त्यामुळे ते घरचा रस्ता विसरत होते, असं त्यांच्या भाचीनं सांगितलं. कुत्रा वास घेत ग्रेगोरिया यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर रेस्क्यू टीमने तहानलेल्या ग्रेगोरिया यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. या व्यक्तीला रुग्णालयातून सोडेपर्यंत कुत्रा गेटबाहेर बसून राहिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Shocking viral video, Top trending, Viral, Viral news