नवी दिल्ली, मार्च : जगभरातील विविध जाती-जमातींमध्ये विविध प्रकारच्या रुढी-परंपरा पाहायला मिळतात. काही प्रथा आकर्षक असतात तर काही खूपच विचित्र असतात. त्यांच्याबद्दल समजल्यानंतर आपल्यासारख्यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. काही देशांतील प्रथा तर फारच भयानक आहेत. अशीच एक विचित्र प्रथा बांगलादेशमधील मंडी जमातीमध्ये पाळली जाते. मंडी जमातीचे लोक शतकानुशतकं या प्रथेचं पालन करत आहेत. या जमातीतील पुरुष नात्यानं मुलगी असणाऱ्या तरुणीशी लग्न करतात. या जमातीमध्ये जेव्हा एखादा पुरुष तरुण वयात एखाद्या विधवा स्त्रीशी लग्न करतो तेव्हाच हे निश्चित होतं की तो भविष्यात त्या स्त्रीच्या मुलीशीच लग्न करेल. या प्रथेमध्ये संबंधित स्त्रिला पहिल्या लग्नातून झालेल्या मुलीशी लग्न लावलं जातं. पुरुषच नाही तर इथे महिलाही फिरतात विनाकपड्यात मुलगी ज्या व्यक्तीला लहानपणापासून आपला पिता मानते, तरुण झाल्यावर त्याच व्यक्तीशी तिला लग्न करावं लागतं. ही वाईट प्रथा गेल्या कित्येक शतकांपासून पाळली जात आहे. या प्रथेमध्ये वडील सावत्र असणं गरजेचं आहे. जन्मदाते वडील या प्रथेचा भाग बनत नाहीत. जेव्हा एखाद्या लहान मुलीची आई असलेली स्त्री तरुण वयात विधवा होते तेव्हा या प्रथेचं पालन केलं जातं. तरुण वयात विधवा झालेल्या स्त्रीशी पुरुष याच अटीवर दुसरं लग्न करतो की, तो नंतर त्या स्त्रीच्या मुलीशी लग्न करेल. या प्रथेबद्दल, या जमातीतील लोकांचा असा विश्वास आहे की, एक तरुण पती आपली पत्नी आणि मुलगी दोघांचंही दीर्घकाळ संरक्षण करू शकतो. मात्र, या परंपरेमुळे मंडी जमातीतील अनेक मुलींचं आयुष्य खराब होत आहे. या प्रथेचे मानसशास्त्रीयदृष्ट्या जास्त दुष्परिणाम होतात, असं अभ्यासकांचं मत आहे. जन्मदाते वडील असो किंवा सावत्र, कोणतीही लहान मुलगी त्यांच्याकडे सारख्याच भावनेनं बघते. त्यांना वडिलांचा दर्जा देते. अशा परिस्थितीमध्ये तरुण झाल्यानंतर त्याच वडिलांशी तिचं लग्न लावून दिलं जातं. काही मुलींच्या मनावर याचा आघात होण्याची शक्यता असते.
जगभरात अशा प्रथा पाळल्या जातात. बहुतांश आदिवासी समाजांत अशा प्रथा प्रकर्षाने पाळल्या जातात. याचा अर्थ असा नाही की सुशिक्षित, पुढारलेल्या समाजात प्रथा नसतात पण त्या वेगळ्या धाटणीच्या असतात. प्रथा कशाही असल्या तरीही कुणांच जगणं त्यामुळे उदध्वस्त होऊ नये इतकंच कोणत्याही समाजानं लक्षात घ्यायला हवं.