मुंबई 26 ऑक्टोबर : कोण? कधी? कुठे? कुणाच्या प्रेमात पडेल याचा नेम नाही. अशीच एक घटना चेन्नईमधील 228 वर्षं जुन्या इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थमध्ये घडलीय. इतक्या वर्षांच्या इतिहासात हा अनोखा प्रकार पहिल्यांदाच घडलाय असं आयएमएचतर्फे सांगण्यात आलंय. दोन रुग्ण उपचारांसाठी इथे आले. पण ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही. सुरुवातीला त्यांना एकमेकांच्या जवळ येण्यापासून थांबवलं गेलं. पण लवकरच हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की, हे दोघं एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे मग त्यांना सोडून दिलं गेलं. आता ते दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. प्रेम भावनेने जग जिंकता येतं असं म्हणतात. अशीच एक जगावेगळी लव्हस्टोरी चेन्नईतल्या आयएमएचमध्ये घडलीय. पी. महेंद्रन आणि दीपा उपचारांसाठी इथे आले. वडिलोपार्जित संपत्तीच्या वादावरून आप्तेष्टांमध्ये कटुता आल्याने महेंद्र अस्वस्थ झाला. हे ही पाहा : Reel करणाऱ्या मुलांनी बस ड्रायव्हरला बनवलं मूर्ख, Video सोशल मीडियावर व्हायरल या संपत्तीमुळे त्याच्या मनात भीती आणि काळजीने घर केलं. दुसरीकडे, दीपाचे वडिल 2016 साली वारले. वडिलांच्या मृत्युमुळे दीपाचं मानसिक संतुलन बिघडलं. आई आणि सख्खी बहीण असूनही तिला एकटं वाटायला लागलं. पण तिची मानसिक स्थिती इतकी बिघडली की, तिला आयएमएचमध्ये अॅडमिट करावं लागलं. आयएमएचमध्ये कधी अॅडमिट केलं कळलंच नाही महेंद्र आणि दीपाला याची कल्पनाही नाही की, त्यांना आयएमएचमध्ये कधी भरती केलं. इस्पितळातील उपचारांसाठी आलेल्या लोकांपैकीच ते एक होते. काही महिन्यांपूर्वी महेंद्र आणि दीपाला इन्स्टिट्युटच्या कॅम्पसमध्ये असलेल्या ‘हाफ वे होम’मध्ये हलवण्यात आलं. ज्यांच्या मनोवस्थेत लक्षणीय सुधारणा झालीय, अशांनाच या ठिकाणी ठेवण्यात येतं. याच ठिकाणी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दीपा आणि महेंद्र शुक्रवारी जवळच्याच देवळात लग्न करणार आहेत. लग्नाबद्दल कधीच विचार केला नव्हता इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दीपा म्हणाली की, वडिलांच्या मृत्युनंतर लग्नाबद्दल कधीच विचार केला नव्हता. महेंद्रने आपली प्रेयसी दीपासाठी सुंदर गाणं म्हटलं. तसंच दीपा आता माझं सर्वस्व आहे असं तो म्हणाला. आयएमएचच्या डायरेक्टर डॉ. पूर्णा चंद्रिका म्हणाल्या, ‘महेंद्र आणि दीपा एकमेकांसोबत खूप वेळ घालवतात. तसंच एकत्र बाहेर फिरायला जातात. फिल्म पाहायलाही जातात.
अशी तक्रार माझ्याकडे आली होती. या गोष्टीवर उपाय म्हणून आम्ही दोघांवर काही बंधन घातली. पण लवकरच आम्हाला त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कळलं. लग्नानंतर त्या दोघांना इथे राहता येणार नाही. पण महेंद्र आणि दीपा आयएमएचजवळच भाडयाने घर घेणार आहेत. जेणेकरून ते एकत्र राहू शकतील.’