जाहिरात
मराठी बातम्या / Viral / तरुणीने कॅब बुक करताच, ड्रायव्हरचा असा मेसेज... दुसऱ्याच क्षणी कॅन्सल केली राईड

तरुणीने कॅब बुक करताच, ड्रायव्हरचा असा मेसेज... दुसऱ्याच क्षणी कॅन्सल केली राईड

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका महिलेने तिला आलेला असाच एक विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला जातो. ज्यामध्ये तिने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 29 जानेवारी : लोकांना प्रवासासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये लोक बस, ट्रेन, कॅब, रिक्षा, बाईक, कार अशा वेगवेगळ्या पर्यांयांचा वापर आपल्या सोयीनुसार करतात. काही लोक प्रायवेट टॅक्सी किंवा कॅब देखील बुक करतात. यासाठी वेगवेगळे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे. कॅब बुक करणे हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी कुठेही लांब जावे लागत नाही शिवाय तासन तास टॅक्सीची वाट पाहत उभ राहावं लागत नाही. शिवाय आपल्याला हवं तिथे ही कॅब येते. त्यामुळे अनेकांचं जीवन सोयीस्कर झालं आहे. पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्यामुळे याच्या फायद्यासोबत तोटे देखील अनेक आहे. असे अनेक लोक आहेत, ज्यांना चुकीच्या अनुभवाला सामोरे जावे लागते. हे ही पाहा : करायला गेला एक आणि घडलं भलतंच, लहान मुलाचा Video पाहून थांबणार नाही हसू एका महिलेने तिला आलेला असाच एक विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला जातो. ज्यामध्ये तिने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे. या मुलीचे नाव आशी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशीला बंगळुरूमध्ये राइड बुक करायची होती आणि तिने उबेरवर कॅब बुक केली. मुलीची राइड बुक होताच, दुसऱ्याच क्षणी कॅब ड्रायव्हरचा मेसेज आला, त्या मेसेजमध्ये ड्रायव्हरने लिहिले की ही राइड रद्द करा, मला झोप येत आहे. त्याचे उत्तर ऐकून आधी मुलगी आश्चर्यचकित झाली, पण शेवटी तिने या कॅब ड्रायव्हरला ओके म्हणून रिप्लाय देऊन टाकला.

जाहिरात

यानंतर तरुणीने या राइडचा आणि मेसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला. मुलीने लिहिले की, तिला बेंगळुरूमध्ये या अनुभवाचा सामना करावा लागला आहे. मुलीने लोकेशन किंवा कॅब ड्रायव्हरबद्दल कोणतीही माहिती दिली नसली पण तिने शेअर केलेला स्क्रीनशॉट नक्कीच व्हायरल झाला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

महिलेनं हा फोटो शेअर करताच, त्यावर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट द्यायला सुरुवात केली आहे, अनेकांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार शेअर केला आहे. तर काहींनी या ड्रायव्हरने खरं म्हटलं असल्याचं सांगितलं आहे. अनेकांनी या ड्रायव्हरची बाजू घेतली, तर काहींनी त्याची तक्रार करण्याचा सल्ला महिलेला दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात