मराठी बातम्या /बातम्या /Viral /Toilet in Flight : विमानातल्या टॉयलेट्सबाबत धक्कादायक सत्य उघड

Toilet in Flight : विमानातल्या टॉयलेट्सबाबत धक्कादायक सत्य उघड

file photo

file photo

विमानप्रवासात विमानातलं टॉयलेट वापरणं कदाचित धोकादायक ठरू शकतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

    नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : रेल्वे किंवा बसच्या प्रवासापेक्षा विमान प्रवासाचं अनेकांना खूप आकर्षण असतं. विमानात बसण्याइतकंच विमानतळावरच्या सोयीसुविधा, विमानातली सेवा हेदेखील यामागचं एक कारण असतं. रेल्वे प्रवासात पँट्रीच्या जेवणाला नावं ठेवणारे विमानात मात्र आवडीनं जेवतात. हाच नियम टॉयलेट्सनाही लागू होतो.

    टॉयलेट्स अस्वच्छ असल्याचं कारण देऊन रेल्वेचा प्रवास अनेक जण टाळतात. मात्र, विमानातल्या टॉयलेट्सच्या स्वच्छतेचं कौतुक करतात. पण विमानातल्या टॉयलेट्सची खरी परिस्थिती समजली, तर कदाचित अनेक जण विमानप्रवासात टॉयलेट्स न वापरण्याचा निर्णय घेतील. विमानाच्या केबिन क्रूमधल्या एका व्यक्तीनं नुकतंच विमानातल्या टॉयलेट्स व स्वच्छतेबाबतचं सत्य सांगितलं.

    विमान प्रवासावेळी अनेक जण निश्चिंत असतात. विमानातल्या टॉयलेट्समध्ये स्वच्छता असेलच, पाणी चांगलं असेलच असा प्रवाशांना विश्वास असतो. त्यामुळेच कोणी स्वतःहून स्वच्छतेची खबरदारी घेत नाही. मात्र, काही गोष्टी सामान्यांना ठाऊक नसतात. विमानप्रवास करणाऱ्या नागरिकांनी विमानातली खरी परिस्थिती जाणून घ्यायला हवी. ती समजली तर पुन्हा विमानप्रवास करताना आवश्यक ती काळजी नक्कीच घेतली जाईल.

    विमानप्रवासात विमानातलं टॉयलेट वापरणं कदाचित धोकादायक ठरू शकतं. कारण विमानातल्या टॉयलेटमध्ये हवा बाहेर जाण्यासाठी खिडकी किंवा इतर कोणतीही सोय नसते. एखाद्या कपाटाप्रमाणे ते सगळीकडून बंद असतं. त्यामुळेच त्यात घाण वास अडकून राहतो. त्याचसोबत टॉयलेटमधून बाहेर पडणारे विषाणूही हवेत तसेच राहतात. अशा टॉयलेटचा वापर केल्यानं आजारी पडण्याची शक्यता असते. टॉयलेटमधल्या वस्तूंवरही सूक्ष्म विषाणू असू शकतात. त्यामुळे टॉयलेटमधल्या वस्तूंना अनावश्यक स्पर्श करणं टाळा. दार उघडताना टिश्यू पेपरचा वापर करा. तसंच टॉयलेटमध्ये जाताना मास्क लावून गेल्यास अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकतं.

    जगातील असे देश जिथे महिला एकापेक्षा जास्त पुरुषांशी करु शकतात लग्न, काय आहे कायदा?

    विमानातल्या बेसिनमध्ये नळाचं पाणी चूळ भरण्यासाठी, हात धुण्यासाठी वापरू नका. विमानातल्या टाक्यांमध्ये भरलेलं पाणी बराच काळ साठवलेलं असतं. तसंच ते स्वच्छ असण्याचीही शक्यता कमी असते. त्यामुळेच चूळ भरण्यासाठी शक्यतो बाटलीतल्या पाण्याचा वापरकरावा. यामुळे असं अस्वच्छ पाणी तुमच्या शरीरात जाणार नाही.

    विमानात शेकडो प्रवासी असतात. विमानांचं सतत उड्डाण होत असतं. त्यामुळे स्वच्छतेसाठी फारसा वेळ मिळत नाही. विमानप्रवासाबाबतचे तज्ज्ञ जॉर्ज होबिका यांनी 'द पोस्ट'ला सांगितल्यानुसार, विमानांची वर्षातून दोनदाच संपूर्ण स्वच्छता केली जाते. एकंदरीत विमानांची एकूण उड्डाणं आणि त्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रवाशानं विमान प्रवासात मास्क आणि सॅनिटायझर जवळ ठेवणं गरजेचं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Airplane, Domestic flight, Travel by flight