मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवऱ्याच्या मृत्यनंतर दीराच्या प्रेमात पडली महिला, पुढे घडलं असं....

नवऱ्याच्या मृत्यनंतर दीराच्या प्रेमात पडली महिला, पुढे घडलं असं....

व्हायरल

व्हायरल

आयुष्यात कधी काय होईल हे सांगणं खूप अवघड आहे. अनेकवेळा आपण विचारही न केलेलं अचानकपणे घडून जातं. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 27 मार्च : आयुष्यात कधी काय होईल हे सांगणं खूप अवघड आहे. अनेकवेळा आपण विचारही न केलेलं अचानकपणे घडून जातं. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं. महिलेची गोष्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. चढ-उतारांनी भरलेल्या महिलेच्या जीवनात अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती आपल्या दीराच्या प्रेमात पडली. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.

न्यू हॅम्पशायरमधील रहिवासी असलेल्या कॅटलिन नॉर्टनने आरोन स्मिथशी लग्न केलं. दोघांनाही अंमली पदार्थांचे व्यसन होतं आणि त्यांच्या लग्नाला 4 वर्षे लोटली. त्यानंतर कॅटलिन रिहॅबमध्ये गेली आणि पतीसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कॅटलिनने फोनवर अॅरॉनला सांगितले की तिला घटस्फोट घ्यायचा आहे. कॅटलिनने पुढील कारवाई करण्यापूर्वी, अॅरॉनने स्वतःचा जीव घेतला. जेव्हा तिला हे कळले तेव्हा ती अपराधी वाटत होतं.

हेही वाचा -  नुकत्याच जन्मलेल्या बाळाने आईला मारली मिठी, पाहून सर्वच थक्क, Video व्हायरल

जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिचा दीर रॉरी तुरुंगात होता. कॅटलिनने डेली स्टारला सांगितले की, रॉरीला भावासोबतचे प्रेमसंबंध आणि लग्नाच्या वेळी मी अजिबात आवडले नाही, परंतु तिच्या पतीच्या मृत्यूनंतर फोनवर त्याच्याशी बोलले. रॉरीचा आवाज कॅटलिनच्या नवऱ्यासारखाच होता, त्यामुळे तिला तो खूप विचित्र वाटला. हळूहळू भा आणि वहिनी यांच्यात प्रेम निर्माण झाले. दोन्ही भावांच्या वागण्यात बराच फरक होता, पण तो नेहमी कॅटलिनला तिच्या नवऱ्याची आठवण करून देत असे. या जोडप्याला आता 2 मुले आहेत. रॉरीला आधीच एक मुलगा होता आणि कॅटलिन आणि अॅरॉनलाही एक मुलगा होता, त्यामुळे दोघेही एकूण 4 मुलांच्या कुटुंबात आनंदी आहेत. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आलीये.

दरम्यान, कधी कोणाला कोणत्या परिस्थितीत कोणावर प्रेम होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे प्रेम सांगून होत नाही असं म्हटलं जातं. यापूर्वीही प्रेमाचे अनेक विचित्र किस्से समोर आले आहेत. आपण विचारही करु शकत नाही अशा घटना चर्चेत आल्यात.

First published:
top videos

    Tags: Love, Marriage, Top trending, Viral, Viral news