अंजली सिंह राजपूत, प्रतिनिधी लखनऊ, 31 मे : प्रेम हे आंधळं असतं असं उगाच म्हटलं नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. दोघेही एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते. त्यांनी कोर्टात जाऊन लग्नही केलं. आता नोकरी लागेल आणि आपला संसार सुखाने सुरू होईल अशी अपेक्षा होती. पण मध्येच लॉकडाऊन लागला आणि हातात असलेली नोकरीही गेली. त्यामुळे दोघांवरही चहाची टपरी चालवण्याची वेळ आली. ‘ये इश्क़ नहीं आसां, बस इतना समझ लीजे, इक आग का दरिया है और डूब के जाना है’ हा डायलॉग आपण सिनेमामध्ये नेहमी ऐकतो. हा डायलॉग लखनऊ येथील राहणारे विनोद आणि रोशनी यांच्या लव्ह स्टोरीवर तंतोतत लागू झाला. रोशनीने कानपुर मेडिकल कॉलेजमध्ये लॅब टेक्नीशियनचा कोर्स केला होता. 2019 मध्ये तिने विनोद याच्यासोबत लव्ह मॅरेज केलं. दोघांच्याही प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. रोशनी शिकलेली होती. पण विनोद हा कमी शिकलेला होता. रोशनी आपल्या शिक्षणाच्या बळावर कानपूरमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्नीशियन म्हणून कामाला लागली. पण लॉकडाऊन लागला आणि तिला नोकरी सोडावी लागली.
अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे दोघेही घरात अडकून पडले होते. हाती जे काही पैसे होते तेही संपले. त्यामुळे घर कसं चालवायचं असा मोठा प्रश्न दोघांपुढे निर्माण झाला. नोद कमी शिकलेला असल्यामुळे त्याला कुठे नोकरीही मिळाली नाही. त्यामुळे दोघांनी जनेश्वर मिश्र पार्क गेट नंबर चार जवळ एक चहाची टपरी सुरू केली. रोशनीनेही अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहे. पण, अजूनही कुठे नोकरी मिळाली नाही. रोशनी ही शिकलेली होती, त्यामुळे तिचं चांगल्या घरात लग्न व्हावं अशी अपेक्षा तिच्या कुटुंबीयांची होती. पण तिने विनोद सोबत लग्न करण्याचा हट्ट लावून धरला होता. त्यामुळेच दोघांनीही घरच्यांच्या विरोधात जाऊन कोर्टात लग्न केले आणि कानपूरमधून पळून जाऊन लखनऊला स्थायिक झाले होते. लग्नाच्या वेळीही घरातील लोक कमालीचे संतापलेले होते. (Marriage : लग्न अडलयं तर या मंदिरात करा बोलणी; संसार सुरू झालाच म्हणून समजा!) ‘रोशनीच्या घरच्यांना माहित नाही की रोशनीने नोकरी सोडली आहे आणि ती आता त्यांच्यासोबत चहा विकत आहे. जर हे कळलं तर तिच्या घरचे लोक आणखी चिडतील. आता आमच्या चहाच्या दुकानात कमाई चांगली आहे. घर आमचं व्यवस्थितीत चालतं रोशनीने एक ठिकाणी मुलाखत दिली आहे. तिला नोकरी मिळेल, असा विश्वास विनोदने व्यक्त केला. दरम्यान, दोघांच्या लग्नाला आता 4 वर्ष झाली आहे. घरातली आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी बाळाचा आग्रहही केला नाही. लग्नाच्या वेळी वाटलं होतं की रोशनी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम केलं तर सगळं सुरळीत होईल, पण तसं झालं नाही. अशा परिस्थितीत मुलांचा खर्च उचलण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे घरच्यांना न सांगता इथं चहा विकावा लागतो. आता दोघांनाही नोकरीची अपेक्षा आहे जेणे करून घर त्याचं सुरळीत चालेल.

)







