Home /News /viral /

कोरोना लशीचा मिळाला दुसरा डोस; गोठलेल्या तलावात भांगडा करुन व्यक्त केला आनंद, VIDEO तुफान व्हायरल

कोरोना लशीचा मिळाला दुसरा डोस; गोठलेल्या तलावात भांगडा करुन व्यक्त केला आनंद, VIDEO तुफान व्हायरल

सध्या पॉझिटिव्हिटी, सकारात्मक वातावरण (Positivity) पसरवण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन कॅनडातील एका शीख कलाकाराने लसीचा डोस मिळाल्याचा आनंद डान्स करुन व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली, 11 एप्रिल : प्रत्येकाच्या आनंद व्यक्त करण्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. कुणी केक कापून आनंद साजरा करतं, तर कुणी देवापुढे साखर ठेवून. कुणी लाडक्या व्यक्तीला आनंदाची बातमी सांगून आपला आनंद साजरा करतं, तर कुणी नाचून. पण सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सर्वांत आनंदाची गोष्ट एकच असू शकते ती म्हणजे कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याची. त्याचा आनंद जसा आपल्याला होतो तसाच आपल्या नातेवाईक मित्रपरिवालाही. सध्या पॉझिटिव्हिटी, सकारात्मक वातावरण (Positivity) पसरवण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन कॅनडातील एका शीख कलाकाराने लसीचा डोस मिळाल्याचा आनंद डान्स करुन व्यक्त केला आहे. कॅनडातील भांगडा कलाकार (BHANGRA ARTIST CANADA) गुरदीप पंधेर यांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नाचून आनंद व्यक्त केला होता आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. तसंच 7 एप्रिलाला त्यांना दुसरा डोस (COVID VACCINATION) मिळाल्यानंतरही त्यांनी आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. कॅनडात सध्या बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे तिथले तलाव गोठले आहेत. गुरदीप यांनी एका गोठलेल्या तलावावर (FROZEN LAKE) जाऊन भांगडा नृत्य केलं आणि त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. शीखांची पगडी घातलेले गुरदीप पँट-शर्ट आणि स्वेटर घालून भांगड्याच्या पारंपरिक संगीतावर उत्तम नाच करताना दिसत आहेत.

(वाचा - कोरोनाबाधित महिलेनं दिला जुळ्या बाळांना जन्म, अनेक रुग्णालयांनी नाकारली प्रसूती)

भांगडा हा पंजाबचा पारंपरिक नृत्यप्रकार आहे आणि तो जगप्रसिद्ध आहे. या व्हिडीओसोबतच्या पोस्टमध्ये गुरदीप यांनी लिहिलंय की, ‘मला कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर मी गोठलेल्या तलावावर म्हणजे निसर्गाच्या कुशीत गेलो आणि पंजाबी भांगडा केला. माझा आनंद, आशा आणि सकारात्मकता जगापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हे केलंय. कॅनडा आणि जगातल्या प्रत्येकापर्यंत मला ही सकारात्मक उर्जा पोहोचवायची आहे.’ गुरदीपच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 804.1 हजार वेळा पाहिला गेला असून, 32.2 हजार जणांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ 5.2 वेळा रिट्विट झाला असून 804 जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी गुरदीप यांचं अभिनंदन केलं असून, वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलंय, ‘हे पाहून मला खूप आनंद झाला, अभिनंदन.’ दुसऱ्याने म्हटलंय, ‘लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरचा आनंद तुम्ही ज्या पद्धतीने साजरा केला तो मला आवडला. असंच नेहमी आनंद शेअर करत रहा. तुम्ही खूप चांगले आहात.’ गुरदीप यांनी 2 मार्चला लसीचा पहिला डोस मिळाल्यावर पोस्ट केलेल्या व्हिडीओलाही नेटकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला होता.
First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine

पुढील बातम्या