मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

अखेर कोरोनाबाधित महिलेनं दिला जुळ्या बाळांना जन्म, अनेक रुग्णालयांनी नाकारली होती प्रसूती

अखेर कोरोनाबाधित महिलेनं दिला जुळ्या बाळांना जन्म, अनेक रुग्णालयांनी नाकारली होती प्रसूती

बिहारमधल्या सगळ्यात मोठ्या असलेल्या पीएमसीएच (PMCH) या पाटण्यातल्या (Patana)हॉस्पिटलने कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीची (Corona Positive Pregnant Woman)प्रसूती करण्यास नकार दिला. मात्र, त्यानंतर एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर्सनी त्या महिलेची सुलभ प्रसूती केली.

पुढे वाचा ...
पाटणा 10 एप्रिल : कोरोना संसर्गाच्या (Corona Pandemic) काळात काळीज हेलावून टाकणारी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आणि सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यातच अशीही काही उदाहरणं पाहायला मिळतात, की आपल्याला थोडा दिलासा मिळतो. अशीच एक घटना शुक्रवारी (9एप्रिल) बिहारमध्ये (Bihar)घडली. बिहारमधल्या सगळ्यात मोठ्या असलेल्या पीएमसीएच (PMCH) या पाटण्यातल्या (Patana)हॉस्पिटलने कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीची (Corona Positive Pregnant Woman)प्रसूती करण्यास नकार दिला. मात्र, त्यानंतर एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर्सनी त्या महिलेची सुलभ प्रसूती केली. त्या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. गोपाळगंज (Gopalganj) जिल्ह्यातल्या जलालपूरमधली (Jalalpur) 38 वर्षांची महिला शुक्रवारी पाटण्याला गेली आणि 'पीएमसीएच'च्या प्रसूती विभागात दाखल झाली होती. मात्र, तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावरचे उपचार थांबवण्यात आले. वास्तविक तिला चांगली वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी पती पंकज राय तिला पाटण्यात या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. संबंधित महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं चाचणीनंतर स्पष्ट झालं. त्यानंतर 'पीएमसीएच'ने प्रसूती करण्यासाठी नकार दिला. त्यानंतर महिलेच्या पतीने अनेक हॉस्पिटल्सचे उंबरठे झिजवले. मात्र, कोणालाही मायेचा पाझर फुटला नाही. शेवटी एका खासगी हॉस्पिटलने मात्र महिलेची स्थिती गंभीर असल्याचं सांगून तिला दाखल करून घेतलं. तिला दाखल केल्यानंतर लगेचच ऑपरेशनची तयारी सुरू करण्यात आली आणि काही तासांतच संबंधित महिलेने जुळ्या बाळांना (Twins)जन्म दिला. डॉक्टर्सच्या प्रयत्नांमुळे प्रसूती सुखरूपपणे पार पडली. या दोन्ही बाळांची जन्मल्या जन्मल्या कोरोना निदानाकरता आरटी-पीसीआर (RTPCR Test) चाचणी करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. दोन्ही बाळांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसून ती सुखरूप असल्याचं सांगण्यात आलं आहे. उदयन हॉस्पिटलचे (Udayan Hospital) संचालक नीरजकुमार यांनी सांगितलं,की कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेने जुळ्या बाळांना जन्म देण्याची ही बिहारमधली पहिलीच वेळ आहे. या महिलेची प्रसूती सुलभपणे पार पाडणं हे मोठं जिकीरीचं आणि कौशल्याचं होतं. मात्र, तरीही डॉक्टर्सच्या प्रयत्नांमुळे ते यशस्वीपणे पार पडलं. संबंधित महिलेच्या पतीनेही हॉस्पिटल व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. कोरोनाच्या काळात जिथे मुळात एका बाळाची प्रसूतीही अवघड, तिथे आईच कोविड पॉझिटिव्ह असताना जुळ्या बाळांच्या प्रसूतीसाठी किती त्रास सहन करावा लागला असेल याची कल्पना न केलेलीच बरी. त्यात ऐनवेळी अनेक हॉस्पिटल्सनी प्रवेश देणं नाकारणं हे दुर्दैवी. मात्र तरीही या सगळ्या अडचणींवर मात करून या बाळांनी जन्म घेतला आहे. परिस्थितीशी झुंज देण्याचा विडा त्यांनी जन्मापासूनच उचलला आहे.
First published:

Tags: Corona, Pregnant woman, Small baby

पुढील बातम्या