बीजिंग, 11 मे : जिथं स्वच्छता, साफसफाई, शांतता असते तिथं लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात. अशा ठिकाणी गेल्यावर लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथं राहते. तिथल्या लोकांवर आपली कृपा करते, त्यांना आशीर्वाद देते असं म्हणतात. याचाच प्रत्यय एका महिलेला आला आहे. या महिलेने घराची साफसफाई केली आणि त्यानंतर लगेच तिच्या दारी लक्ष्मी आली. महिलेच्या घरात चक्क पैशांचा पाऊस पडला आहे. चीनच्या अनहुई प्रांतातील ही घटना आहे. एक महिला आपलं घर साफ करत होती. तिनं घरातील ब्लँकेट बाल्कनीत आणलं. जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळेल. बाल्कनीत येताच तिने एक ब्लँकेट झाडलं आणि पाहते तर काय चक्क पैशांचा पाऊस पडू लागला. सगळीकडे पैसाच पैसा. काही पैशांच्या नोटा तिच्या घरात तर काही तिच्या शेजाऱ्यांच्या घरातही गेल्या. तिचे शेजारीही तिला पाहत होते. तेसुद्धा पैशांचा पाऊस पाहून चक्रावले.
इतके पैसे पाहून कुणालाही साहजिकच आनंद होईल. या महिलेलाही झाला. तिने पटापट पैसे जमा केले, पण इतके पैसे आले कुठून असा प्रश्न तिला पडला. 2 कोटींची ऑफर; फक्त स्वतःच्या केसांची निगा राखण्यासाठी तरुणीने सोडली नोकरी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या शेवटी तिने यामागील सत्य सांगितलं. हे पैसे तिच्या नवऱ्याचे होते. हे आपले पैसे असल्याचं त्याने तिला सांगितल्याचं ती म्हणाली. तिचा नवरा जिथं काम करत होता. तिथून त्याला बोनस मिळाला होता. तब्बल साडेतीन लाख रुपये होते. जे त्याने या ब्लँकेटच्या आत लपवून ठेवले होते.