जॅस्मिन लॅरसेन असं या महिलेचं नाव आहे. बायोकेमिस्ट्रीमध्ये डिग्री केल्यानंतर एडिटरची नोकरी करत होती. पण 25-26 वर्षांची असतानाच तिने नोकरी सोडली. तिने फक्त आपल्या सुंदर केसांवर लक्ष केंद्रीत केलं.
2017 सालापासून तिने आपले केस कधीच कापले नाहीत. ती आपल्या केसांसठी सिलिकॉन फ्री तेलाचा वापर करते. इंग्लिश ब्रेड ही तिची आवडती हेअरस्टाईल आहे. यामुळे केस कोरडे होत नाहीत.
लहानपणापासून तिची आई तिची वेणी घालून तिला शाळेत पाठवायची असं ती म्हणाली. आपल्य केसांची इतकी चांगली काळजी घेतल्याने तिने आपल्या आईचेही आभार मानले.
तिच्या केसांचे खूप चाहते आहेत. कित्येक पुरुष तिच्या केसांचे दिवाने आहेत. काही जण तर कोट्यवधी रुपयांत तिचे केस विकत घेण्यासही तयार आहेत. एका व्यक्तीने तिला तब्बल दोन कोटी रुपयांची ऑफरही दिली होती.
बरेच लोक तिला तिच्या केसांचा पर्सनल व्हिडीओ शेअर करायला सांगता. काही लोक तिला हेअरस्टाईलही करायला सांगतात. तिच्या सुंदर केसांमुळे तिला लग्नाच्या मागण्याही खूप येतात. तर काही जण तिला कॅन्सरग्रस्तांच्या विगसाठी केस दान न केल्याने ट्रोलही करतात. (सर्व फोटो - Instagram/jasmine_lars)