अभिनव कुमार, प्रतिनिधी दरभंगा, 11 जून : ‘पाण्याचं काम फक्त पाणीच करतं’, या ओळीचा अर्थ कडक उन्हातून येऊन थंडगार पाणी प्यायल्यावरच कळतो. अशावेळी अगदी तृप्तच व्हायला होतं. खरंच पाण्याचं आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तज्ज्ञमंडळी कायम सांगतात की, भरपूर पाणी प्या आणि शरीर निरोगी ठेवा. मात्र तुम्ही कधी विहिरीचं पाणी प्यायल्यामुळे पोटाचे आजार नष्ट होतात असं ऐकलंय का? अहो ऐकताय काय…बिहारमध्ये चक्क असं घडलंय. बिहारच्या पटोरी गावाबाहेर असलेल्या शेतात अगदी मध्यभागी एक विहीर आहे. या विहिरीचं पाणी प्यायलं की, अपचन, गॅस, पोटदुखी, मळमळ, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या विकारांपासून काही वेळातच मुक्ती मिळते आणि पोट साफ होतं, असं इथल्या गावकऱ्यांचं मत आहे. परंतु हे किती सत्य आहे, यावर अद्याप काही संशोधन झालेलं नाही.
गावकऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रणरणत्या उन्हातही या विहिरीचं पाणी अतिशय थंड असतं. शिवाय त्याची चवही चांगली असते. दूर-दूरच्या गावातील लोक खास हे पाणी पिण्यासाठी याठिकाणी येतात. त्याचबरोबर अनेकजण हंडेच्या हंडे भरून पाणी घेऊनही जातात. Solapur News: सोलापूरहून अजमेर प्रवास झाला सोपा, रेल्वेकडून विशेष गाडी लष्कराच्या वायूदलातून निवृत्त झालेले एक अधिकारीही या गावात राहतात. त्यांनी सांगितलं की, ‘एकदा मी गावाबाहेर पाय मोकळे करत असतानाच मला अपचनाचा त्रास होऊ लागला. मग मी जवळच असलेल्या या विहिरीवर येऊन पाणी प्यायलो. त्यानंतर घरी जायला निघालो. त्यावेळी वाटेतच मला पूर्ण बरं वाटू लागलं होतं. असा अनुभव मला दोनदा आला. त्यामुळे या विहिरीच्या पाण्यात काय आहे माहिती नाही, परंतु काहीतरी अशी गोष्ट आहे जिच्यावर संशोधन व्हायला हवं हे नक्की.’