मुंबई, 07 मार्च : किती तरी लोकांना समोर साधा गांडूळ जरी दिसला तरी भीती वाटते. मग साप दिसला तर मग निम्मा जीव गेल्यातच जमा. साप म्हटलं तरी अंगाला दरदरून घाम फुटतो. फिल्ममध्ये आपण सापांना पाहतो. सापांचे बरेच व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ते फक्त पाहूनच आपल्या अंगावर काटा येतो. आता तर अशा मुलीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जी चक्क अशाच भल्यामोठ्या सापासोबत खेळताना दिसली आहे (Little girl playing with snake).
सापासोबत खेळणाऱ्या या मुलीच्या व्हिडीओने सर्वांनाच धडकी भरली आहे. ही मुलगी खतरनाक सापाला आपल्या हातांनी पकडण्याचा प्रयत्न करते आहे. एकदा दोनदा नव्हे तर बऱ्याच वेळा ती आपल्या हातांनी या सापाला मागे खेचतं. पाहूनच आपल्या हृदयाची धडधड वाढते.
व्हिडीओत पाहू शकता एका कपड्यावर काळ्या रंगाचा साप आहे. त्याच्यासोबत एक मुलगी खेळताना दिसते आहे. ही मुलगी सापासोबत असं खेळते, जणू काही ते खेळणंच आहे. साप इतका भयानक आहे की पाहूनच आपल्याला धडकी भरते. पण ही मुलगी मात्र त्याला बिलकुल घाबरत नाही आहे. तिच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नाही आहे. उलट हसत हसत ती त्याच्यावरून हात फिरवते आहे आणि त्याला आपल्या दिशेने खेचते आहे.
हे वाचा - आकाशपाळणा गरागरा फिरला आणि... मुलाला आठवले देव-अख्खं खानदान; नेमकं काय घडलं पाहा
काही क्षण सापाचं तोंड मुलीच्या दिशेनं येतं. त्यावेळी आता हा तिच्यावर हल्ला करतो की काय अशा भीतीने काळजात धस्सं होतं. पण सुदैवाने तसं या व्हिडीओत तरी काही होताना दिसत नाही. उलट साप तिच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो आहे.
snakemasterexotics नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एवढ्याश्या मुलीला इतक्यामोठ्या सापासोबत पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
हे वाचा - युक्रेनियन चिमुकलीचा भावुक करणारा VIDEO आला समोर, पाहूनच पाणावतील डोळे
एका युझरने हे रिअल आहे का असं विचारलं आहे. एका युझर्सने मुलीच्या हिमतीला दाद दिली आहे. तर काही युझर्सनी पालकांनी आपल्या मुलांना अशा जीवांसोबत एकटं सोडू नये, असं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.