जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आईस्क्रीम डोसा नंतर... मटका डोसाने वेधलं लक्ष, Video पाहून तोंडाला सुटेल पाणी

आईस्क्रीम डोसा नंतर... मटका डोसाने वेधलं लक्ष, Video पाहून तोंडाला सुटेल पाणी

व्हायरल

व्हायरल

आजकाल खाद्यपदार्थांचे शौकीन असलेल्या लोकांमध्ये भर पडली आहे. लोकांना देशभरातील प्रत्येक शहरात विविध प्रकारचे पदार्थ आवडतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 मार्च : आजकाल खाद्यपदार्थांचे शौकीन असलेल्या लोकांमध्ये भर पडली आहे. लोकांना देशभरातील प्रत्येक शहरात विविध प्रकारचे पदार्थ आवडतात. ज्यामध्ये स्ट्रीट फूड सर्वात जास्त आवडते. जिथे काही लोक पाणीपुरीसाठी वेडे झालेले दिसतात. दुसरीकडे, काही लोक नेहमी नवीन प्रकारच्या खाण्याच्या शोधत असतात. त्यामुळे विक्रेतेही खाण्याच्या पदार्थांचे व्हेरियेशन करताना दिसतात. आत्तापर्यंत खाण्यावर अनेक प्रयोग झालेले पहायला मिळाले. सोशल मीडियावर कायमच व्हारायटीज ऑफ फूडचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडलीये. आपण आत्तापर्यंत डोसामध्ये अनेक प्रकार पाहिले आहेत. यामध्ये मॅगी, मिल्कशेक, आईस्क्रीम आणि चहाचे असे अनेक प्रयोग पहायला मिळाले. सध्या डोस्याचा नवा प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये रस्त्यावर एक विक्रेता मटका डोसा बनवताना दिसतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जाहिरात

हा व्हायरल व्हिडिओ दीपक प्रभू नावाच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक स्ट्रीट फूड विक्रेता डोसा बनवताना दिसत आहे. ज्यासाठी तो प्रथम पनीर, कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो भरपूर बटरमध्ये तळतो. त्यानंतर तो त्यात सॉस मिसळतो. त्यानंतर, ती व्यक्ती भांड्यात मेयोनीझ टाकून त्यात चिरलेली कोबी आणि चीज घालून डोसा बनवते. डोसा बनवल्यानंतर तो शंकूच्या आकाराच्या मटक्यात बनवतो, एका भांड्यात ठेवतो आणि त्यावर अनेक गोष्टी ओततो. हा मटका डोस्याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, मटका डोस्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून व्हिडीओवर खूप कमेंटदेखील येत आहेत. अनेकांनी या डोस्याचं कौतुक केल्याचं कमेंटमध्ये पहायला मिळालं. तर काहींना हा प्रयोग आवडला नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे व्हिडीओवर एकंदरीत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात