Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बायकोला दिली प्रेमाची अनोखी निशाणी; PHOTOS पाहून म्हणाल 'वाह ताज'!

बायकोला दिली प्रेमाची अनोखी निशाणी; PHOTOS पाहून म्हणाल 'वाह ताज'!

शाहजहाननंतर बायकोला ताजमहाल भेट म्हणून देणारा हा पहिलाच नवरा...

शाहजहाननंतर बायकोला ताजमहाल भेट म्हणून देणारा हा पहिलाच नवरा...

शाहजहाननंतर बायकोला ताजमहाल भेट म्हणून देणारा हा पहिलाच नवरा...

  • Published by:  Meenal Gangurde

भोपाळ, 22 नोव्हेंबर : बादशाह शाहजहानने आपली बेगम मुमताज हिच्यासाठी ताजमहाल (TajMahal) या कलाकृतीची निर्मिती केली. या कलाकृतीची न भूतो न भविष्यते निर्मिती होऊ शकत नाही. हे खरंच आहे. प्रेम व्यक्त करणाऱ्या या निशाणीची लहानशी प्रतिकृती तरुण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुणींना भेट म्हणून देतात. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बुरहानपूरमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रेमाखातन ताजमहालसारख्या घराची निर्मिती केली. हा खऱ्याखुऱ्या ताजमहालसारखं दिसणारं चार बेडरूमचं घऱ आहे. (A unique sign of love given to a wife Husband built a house like Taj Mahal)

या घरात 4 बेडरूम, एक किचन, एक लायब्ररी आणि एक मेडिटेशन रूम आहे. हे घर उभारण्यासाठी तीन वर्षे लागले. या ताजमहालसारख्या घरात खऱ्या ताजमहालप्रमाणे मिनारे आहेत. घराचं फ्लोरिंग राजस्थानमधील मकराना आणि फर्निचर मुंबईतील कारागिरांकडून तयार करून घेतलं आहे. इतकच नाही तर घराच्या आत आणि बाहेर अशा प्रकारचं लायटिंग करण्यात आलं आहे की, रात्रीच्या अंधारातही घर एकदम ताजमहालप्रमाणे चमकतो.

हे ही वाचा-कारच्या धडकेनं पती-पत्नीने उडाले हवेत, अपघाताचा Live Video

बुरहानपूरमध्ये मुमताजचा मृत्यू..

बुरहानपूरमध्ये राहणारा आनंद चौकसे याला नेहमी खंत होती की, जगभरात प्रेमाची निशाणी म्हणून प्रसिद्ध ताजमहाल बुरहानपूरमध्ये का नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शाहजहाची बेगम मुमताजचा मृत्यू बुरहानपूरमध्ये झाला होता आणि शाहजहाने ताजमहाल उभा करण्यासाठी ताप्ती नदीच्या किनाऱ्याची निवड केली हो ती.

यानंतर आग्रामध्ये ताजमहाल उभारण्यात आला. आपल्या इच्छेसाठी आनंद चौकसेने आपल्या पत्नीसाठी ताजमहालसारखं घर गिफ्ट केलं.

इंजिनिअरना करावी लागली मेहनत...

ताजमहालसारखं घर उभारणाऱ्या इंजिनिअरनी सांगितलं की, ताजमहालसारखं घर तयार करण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्या होत्या. कारण यासाठी ताजमहालचा लक्षपूर्वक अभ्यास करावा लागला.

ताजमहालसारख्या घरात डोम 29 फूट उंच ठेवण्यात आलं आहे. यात एक मोठा हॉल, खाली 2 बेडरूम, 2 बेडरूम वरच्या मजल्यावर, एक किचन, एक लायब्ररी आणि एक मेडिटेशन रूमदेखील तयार करण्यात आला आहे. घराच्या आतील भिंतींचं नक्षीकाम करण्यासाठी बंगाल आणि इंदूरच्या कलाकारांची मदत घेण्यात आली आहे.

First published:

Tags: Madhya pradesh, Tajmahal, Waah taj, Wife and husband