Home /News /viral /

OMG! असं कुठं असतंय व्हय? ही इमारत बघून व्हाल थक्क

OMG! असं कुठं असतंय व्हय? ही इमारत बघून व्हाल थक्क

तुटपुंज्या जागेत (Minimum land) उभं करण्यात आलेलं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स (Shopping complex) सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलंच व्हायरल (Viral) झालं आहे.

    जयपूर, 6 सप्टेंबर : भारतात एखाद्या जागेचा (Land) जास्तीत जास्त वापर (Use) कसा करून घेता येईल, याचे वेगवेगळे प्रयोग सतत करण्यात येतात. त्यातील काही प्रयोग इतके वेगळे असतात की ते सर्वांचंच लक्ष वेधून घेतात. तुटपुंज्या जागेत (Minimum land) उभं करण्यात आलेलं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स (Shopping complex) सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलंच व्हायरल (Viral) झालं आहे. मूळ जागा कमी असली तरी ते बांधणाऱ्यानं अशी काही कमाल केली आहे, की पाहणाऱ्याने पाहतच राहावं. अशी बांधली इमारत ही इमारत आहे राजस्थानची राजधानी जयपूरमधली. प्रदीप शेखावत नावाच्या एका युजरनं या इमारतीचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. फोटोत दिसणाऱ्या या इमारतीची जागा आहे 10 बाय 20 मी टर. मात्र त्यावर बांधण्यात आलेल्या दुसऱ्या मजल्याचा एरिया आहे 20 बाय 30 मीटरचा. पहिल्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या दुकानाचा एखाद्या पिलरप्रमाणं वापर करून वरच्या मजल्याचा विस्तार वाढवण्यात आला आहे. इमारतीची अनोखी रचना या इमारतीची अनोखी रचना बघून कुणालाही आश्चर्य वाटेल. खालचा मजला छोटा आणि वरचा मजला मोठा बांधण्यात आला आहे. वरच्या मजल्यावरचा स्लॅब वाढवून जणू चारही बाजूंनी गॅलरी तयार करण्यात आली आहे. मात्र याचा गॅलरीसारखा वापर न करता त्याला पूर्ण खोलीचं स्वरूप देण्यात आलं आहे. त्यामुळे खालच्या मजल्यावरील दुकानाच्या तुलनेत वरचं दुकानं फारच प्रशस्त झालं आहे. मूळ जागा कमी असतानाही अनोखी शक्कल लढवून बांधलेल्या या इमारतीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पालिकेच्या नियमांत अशी इमारत बांधणं बसतं का, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. या इमारतीचा फोटो अपलोड करताना तो जयपूर पालिकेला टॅग केला आहे. यावर आता पालिका काय प्रतिक्रिया देते, ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Jaipur, PHOTOS VIRAL

    पुढील बातम्या