जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भारतीय समजून पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडली रशियन तरुणी, सत्य समजताच घडलं असं काही....

भारतीय समजून पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडली रशियन तरुणी, सत्य समजताच घडलं असं काही....

भारतीय समजून पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडली रशियन तरुणी, सत्य समजताच घडलं असं काही....

प्रेम ही अतिशय सहजसुलभ भावना असते. प्रेमाला कोणत्याच गोष्टीचं बंधन नसतं. प्रेमात पडल्यावर व्यक्ती एका अर्थानं बेभान होऊन जाते.

  • -MIN READ Trending Desk Maharashtra
  • Last Updated :

     मुंबई, 9 सप्टेंबर-   प्रेम ही अतिशय सहजसुलभ भावना असते. प्रेमाला कोणत्याच गोष्टीचं बंधन नसतं. प्रेमात पडल्यावर व्यक्ती एका अर्थानं बेभान होऊन जाते. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलून जातो. प्रेमात पडण्यासाठी कोणती गोष्ट कारणीभूत ठरेल, याचा अंदाज बांधणंही कठीण असतं. सध्याच्या काळात सोशल मीडियामुळे प्रेमात पडणं, प्रेमाची कबुली देणं या गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बहरलेली अशीच एक लव्हस्टोरी  नेटिझन्सच्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही लव्हस्टोरी हटके आहे. एक रशियन तरुणी  एका पाकिस्तानी युवकाच्या प्रेमात पडली. या युवकाच्या इन्स्टाग्रामवरच्या  खास पोस्ट्स पाहून ही तरुणी त्याच्याकडे आकर्षित झाली. हा युवक पाकिस्तानी आहे, हे तिला माहीत नव्हतं. एका मुलाखतीत तरुणीने तिची लव्ह स्टोरी सांगितली. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एका रशियन तरुणीची एका युवकाशी ओळख झाली. हा युवक इन्स्टाग्रामवर बॉलिवूडची गाणी (Bollywood Songs) स्वतःच्या आवाजात गाऊन शेअर करत असे. या युवकाचा आवाज या तरुणीला भावला. त्यानंतर या दोघांचा परिचय वाढत गेला आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले; पण या लव्ह स्टोरीत एक ट्विस्ट आहे. या लव्हस्टोरीतल्या युवकाचं नाव फैजल (Faisal) असून, तो पाकिस्तानातला (Pakistan) कराचीमधला रहिवासी आहे, तर तरुणी रशियात राहते. या दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. तिला बॉलिवूडची गाणी खूप आवडतात. `मी कायम बॉलिवूडची गाणी गातो. या तरुणीनं इन्स्टाग्रामवरची माझी गाणी ऐकली आणि ती माझी फॅन झाली,` असं फैजलनं `डेली पाकिस्तान ग्लोबल`शी बोलताना सांगितलं. फैजलनं या तरुणीला `मैं हमेशा से तेरा ही रहा….` हे गाणं गाऊन दाखवलं. हे गाणं भारतीय गायक जुबिन नौटियाल यानं गायलं आहे. याशिवाय त्यानं त्या तरुणीला `मैं हूं यहां, तू है वहां….` यांसारखी काही गाणी ऐकवली. ही गाणी रशियन तरुणीला खूप भावली आणि ती फैजलच्या प्रेमात पडली.

    फैजलने गायलेली बॉलिवूडची गाणी ऐकल्यानंतर त्या तरुणीला फैजल हा भारतीय (Indian) आहे असं वाटलं. तिनं त्याला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला. यानंतर त्यांच्यात व्हिडिओ कॉलवर संभाषणं झाली आणि ते एकमेकांच्या अधिक जवळ आले; मात्र नंतर फैजलने तो पाकिस्तानी असल्याचं त्या तरुणीला सांगितलं. तसंच त्यानं पाकिस्तानमधल्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांचे फोटो पाठवले. (हे वाचा: तरुणीने एकाच वेळी दोन पुरुषांसोबत ठेवले संबंध; जन्माला आली अशी मुलं बसला धक्का ) या रशियन तरुणीनं एका मुलाखतीत सांगितलं की, `मला फैजलचा आवाज आवडला. फैजलनं बॉलिवूडची अनेक गाणी गायली होती. ही गाणी ऐकल्यानंतर मी त्याच्या अधिक जवळ गेले. यानंतर मी फैजलशी लग्न करण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेले. फैजल बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीसारखा दिसतो.`पाकिस्तानी युवकाच्या गायनाकडे आकर्षित झालेली रशियन तरुणी आणि त्यातून त्यांची बहरलेली लव्हस्टोरी हा सध्या नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात