ब्राझिलिया, 07 सप्टेंबर : एकमेकांना शरीराने जोडलेली सयामी जुळी, दोन हातापायांचं बाळ अशी काही विचित्र प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण सध्या असं प्रकरण चर्चेत आलं आहे जे जगातील दुर्मिळ असं प्रकरण आहे. एका महिलेने अशा जुळ्यांना जन्म दिला आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अशी मुलं जन्माला येण्याचं कारण म्हणजे या महिलेने एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत ठेवलेले संबंध. बाळांच्या डीएनए रिपोर्टमधून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. ब्राझीलच्या गोइंयासमधील Mineiros शहरात राहणारी 19 वर्षांच्या तरुणीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तिने या मुलांची डीएनए टेस्ट करून पाहिली. बाळांची डीएनए टेस्ट झाली. त्याचा रिपोर्ट आला तो पाहून महिला हादरलीच. कारण तिने जन्म दिलेल्या जुळ्या बाळांचा डीएनए सारखा नव्हता. आता जुळी मुलं म्हणजे त्यांची डीएनए सारखेच. पण या मुलांचे डीएनए मात्र वेगवेगळे होते. म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या या जुळ्या मुलांचे वडील मात्र वेगवेगळे होते. हे वाचा - ऑफिसमधून निघताच अचानक जन्माला आलं बाळ; प्रेग्नन्सी लक्षणांशिवायच आई होताच महिलेने… पण या मुलांचे चेहरेही एकमेकांशी इतके जुळत होते की त्यांचे वडील वेगवेगळे असू शकतील याचा विचारही या तरुणीने केला नव्हता. त्यानंतर तिने याबाबत मोठा खुलासा केला. तरुणीने सांगितलं की ती एकाच वेळी दोन पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. यामुळेच तिच्यासोबत असं झालं. ती स्वतःच रिपोर्ट पाहून हैराण झाली. डेली मेल च्या रिपोर्टनुसार या महिलेचे डॉ. तुलिओ जॉर्ज फ्रँको यांच्या मते, वैद्यकीय भाषेत याला हेट्रोपॅरेंटल सुपरफेक्युंडेशन म्हणतात. जगातील हे असं 20 वं प्रकरण आहे. जेव्हा महिलेचं बीजांड दोन वेगवेगळ्या पुरुषांच्या शुक्राणूने फलित होतं, तेव्हा अशी जुळी जन्माला येतात. ज्याचं जेनेटिक घटक आईचं असतं पण प्लेसेंटा वेगळे असतात. हे वाचा - 15 वर्षांच्या मुलाने प्रायव्हेट पार्टसोबत केला नको तो खेळ; मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक बाळांच्या जन्मानंतर 8 महिन्यांनी त्यांची डीएनए टेस्ट झाली तेव्हा तरुणीचं हे सत्य समोर आलं. आता ही मुलं दीड वर्षांची आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.