Home /News /viral /

बिहारमधील एका अफवेमुळे Parle-G कंपनी फायद्यात; काय आहे नेमका प्रकार?

बिहारमधील एका अफवेमुळे Parle-G कंपनी फायद्यात; काय आहे नेमका प्रकार?

अचानक पार्ले-जी बिस्किटं (Parle-G Biscuit) खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आणि बघता बघता सगळीकडची पार्ले-जी बिस्किटं संपून गेली.

    बिहार, 1 ऑक्टोबर : आपल्या देशात कधी कोणत्या गोष्टीला महत्त्व येईल सांगता येत नाही. व्रतवैकल्यं, कर्मकांडे याचा प्रभाव अधिक असल्यानं याबाबत एखादी लहानशी बाबही वावटळीसारखी सगळीकडे पसरते आणि सगळेजण त्याच्याच मागे धावतात. त्यामुळे अनेक चित्रविचित्र घटना घडत असतात. अशीच एक अजब घटना नुकतीच बिहारमध्ये (Bihar) घडली आहे. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यासह (Sitamadhi District) आसपासच्या चारपाच जिल्ह्यांमध्ये अचानक पार्ले-जी बिस्किटं (Parle-G Biscuit) खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आणि बघता बघता सगळीकडची पार्ले-जी बिस्किटं संपून गेली. या बिस्किटांना इतकी मागणी आली, की इथल्या बाजारपेठेत असलेला पार्ले-जीचा काही दिवसांसाठीचा साठा एका दिवसातच संपला आहे. आज तिथे अशी अवस्था आहे, की एकाही दुकानात पार्ले-जीची बिस्किटं शिल्लक नाहीत. या सगळ्या प्रकारामुळे पार्ले-जी कंपनीला (Parle-G Company) मात्र प्रचंड फायदा (Huge Profit) झाला आहे. सध्या बिहारमध्ये व्रतवैकल्यांचा काळ आहे. यामध्ये नुकतंच मुलांसाठी आईनं करण्याचं जीतिया (Jeetiya) हे व्रत करण्यात आलं. या व्रतात माता आपल्या लहान मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात. या व्रताचं उद्यापन करण्याच्या दिवशी अचानक अफवा पसरली की, ज्या मातांनी हे व्रत केलं आहे, त्यांनी उद्यापन करताना पार्ले जी बिस्किट खाऊन त्याचं पारणं केलं पाहिजे. अन्यथा त्यांच्या मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. बघता बघता ही अफवा (Rumour) वणव्यासारखी सर्वत्र पसरली. सीतामढीच नाही तर आसपासच्या चार-पाच जिल्ह्यांमध्ये ही अफवा पसरली. विशेषतः ग्रामीण भागात तर या अफवेनं कहरच केला. दुकानांसमोर (Shops) पार्ले-जी खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. पार्ले-जी बिस्किटांना आलेली मागणी बघून अनेकांनी त्याचा काळाबाजार सुरू केला. लोकांनी वाटेल ती किंमत देऊन ही बिस्किटं खरेदी केली. बघता बघता बाजारपेठेतला पार्ले-जीचा सगळा साठा संपून गेला, असं 'लोकमतन्यूज डॉट इन'च्या बातमीत म्हटलं आहे. हे ही वाचा-लग्नाचे फोटोज Delete करुन फोटोग्राफने काढला पळ, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असल्यानं कोणीही यामागची सत्यता पडताळून घेण्याची तसदी घेतली नाही. ही अफवा कशी, कोठून पसरली याचा काहीही ठावठिकाणा अद्याप लागलेला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पार्ले -जी ही भारतातली एक अत्यंत जुनी बिस्किट कंपनी आहे. पार्ले-जी हे बिस्किट सर्वसामान्य जनतेत अगदी लोकप्रिय आहे. गेल्या काही वर्षांत बिस्किटांच्या बाजारपेठेत अनेक नवीन ब्रँड आल्यानं पार्ले-जीला स्पर्धा वाढली होती आणि हे बिस्किट काहीसं मागं पडलं होतं. आता पुन्हा एकदा पार्ले-जी या प्रकारामुळे चर्चेत आलं आहे.
    First published:

    Tags: Bihar

    पुढील बातम्या