नवी दिल्ली, 27 जून : दैनंदिन जीवनात लोकांची खूप धावपळ होत आहे. कामानिमित्ताने लोक लांब लांबचा प्रवास करतात यामुळे थकून जातात. त्यांना पुरेशी झोपही मिळत नाही. त्यामुळे अनेकदा प्रवासादरम्यान लोक झोपतात. मात्र कधी कधी प्रवासादरम्यान डुलकी घेणं, झोपणं अनेकांना महागात पडतं. प्रवासादरम्यान लोकांच्या झोपण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. झोपेमुळे अनेकजणांना अपघाताचा सामना करावा लागतो. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये झोपेमुळे व्यक्तीसोबत मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. तुम्हीही बस किंवा कारमधून प्रवास करताना कधी ना कधी झोपलाच असेल. झोपेमुळे असे अपघात होतात की त्यात लोकांना आपला जीव गमवावा लागतो. बसमध्ये झोपणे किती धोकादायक असू शकते हे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरुव तुम्ही अंदाज लावू शकता.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीला चालत्या बसमध्ये डुलकी लागते. रात्रीची वेळ असून बस भरधाव वेगाने धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. बसमध्ये एक व्यक्ती दाराच्या शेजारी बसलेली असते आणि दुसरी व्यक्ती ड्रायव्हरच्या शेजारी बसलेली असते. दरवाज्याजवळ असलेल्या व्यक्तीचा झोपेाच्या नादात तोल जातो आणि तो बसच्या बाहेर कोसळतो.
व्यक्ती पुढच्याच क्षणी दरवाज्यातून बाहेर पडते. ड्रायव्हर शेजारील व्यक्ती तातडीने गाडी थांबवते आणि खाली पडलेल्या व्यक्तीकडे धाव घेते. हे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. @MadnessCube_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 23 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे.