जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रेल्वेत 'ती' गोष्टी करायचा म्हणून विमानातही केली, पुढं घडलं धक्कादायक

रेल्वेत 'ती' गोष्टी करायचा म्हणून विमानातही केली, पुढं घडलं धक्कादायक

विमानातील विचित्र घटना

विमानातील विचित्र घटना

अनेक लोक विमानाने प्रवास करतात. मात्र प्रवादरम्यान अनेक विचित्र घटना घडताना दिसतात. आत्तापर्यंत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये प्रवासी आपल्या कृत्याने बाकीच्या लोकांना त्रास देतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 मे : अनेक लोक विमानाने प्रवास करतात. मात्र प्रवादरम्यान अनेक विचित्र घटना घडताना दिसतात. आत्तापर्यंत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये प्रवासी आपल्या कृत्याने बाकीच्या लोकांना त्रास देतात. भांडणं, सामान चोरीला जाणं, लघवी करणं, दुसऱ्यांच्या अंगावर उलटी करणं, अशा घटना समोर आल्या आहेत. अशातच यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. फ्लाइटमध्ये बिडी ओढताना एका व्यक्तीला पकडल्याची घटना समोर आली आहे. ज्याच्या उत्तराने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही घटना आकाश एअरलाइन्सच्या फ्लाइटची आहे. प्रवीण कुमार असं या आरोपीचे नाव आहे. ते अहमदाबादहून बेंगळुरूला विमानानं जात होते. बेंगळुरू पोलिसांनी या व्यक्तीवर फ्लाइटमध्ये बिडी ओढल्याचा आरोप केला आहे. सध्या, प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी कुमारला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (KIA) अटक केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मिळालेल्या माहितीनुसार, विमान हवेत असताना आरोपींनी विडी पेटवली आणि धुम्रपान केले, त्यामुळे इतर प्रवाशांचा जीव धोक्यात आला. तो बांधकाम व्यवसायात काम करतो, असं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. तो पहिल्यांदाच विमानात चढला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपी एका वृद्ध व्यक्तीसोबत प्रवास करत होता. तो नेहमी ट्रेनने प्रवास करत असल्याचंही सांगितलं. यादरम्यान तो नेहमी टॉयलेटमध्ये धुम्रपान करत असे. त्याला वाटत होतं की तो विमानातही असंच करू शकतो. यामुळे त्यांनी विमानातच विडी पेटवून ते प्राशन केलं. दुसऱ्या एका वृत्तानुसार, आरोपी प्रवीण हा राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील रहिवासी आहे. एका नातेवाईकाच्या निधनाने ते बंगळुरूला जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला सध्या बंगळुरू सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. झी न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे. हेही वाचा - Viral Video : अचानक वधू स्टेजवर करायला लागली विचित्र कृत्य, वरासह सर्वच घाबरले दरम्यान, विमान धक्कादायक प्रकार घडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. ज्यामुळे इतर काही ठराविक लोकांमुळे इतर प्रवाशांनाही त्रास होतो. सध्या ही समोर आलेली घटना सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात