मुंबई 14 मार्च : आपल्या मुलाने आयुष्यात काहीतरी चांगलं काम करावं, अशी कोणत्याही पालकांची इच्छा असते. ही त्यांच्यासाठी सर्वात आनंदाची गोष्टही असते. जर मुलाकडे भरपूर पैसा असेल, तर त्याचं आयुष्य आरामात जाईल, त्याला कोणतीही चिंता नसेल आणि मुलगा खूश असेल तर पालकही खूश असतील. पण एक मुलगा असा आहे ज्याच्याकडे हे सर्व आहे, तरीही तो आपल्या पालकांना याबद्दल सांगण्यास घाबरतो. त्यामागचं पालकांचं कारणही फार वेगळं आहे. महत्त्वाचं म्हणजे एवढा भरमसाठ पैसा कमावणारा हा मुलगा त्याच्या पालकांसमोर खूप साधा राहतो. त्याच्याकडे पैसा किंवा संपत्ती आहे, हे तो दाखवत नाही.
महाराष्ट्रात 'इथे' लाखो रूपयांना विकलं जातंय एक गाढव; कारण माहितीये का?
'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, या 26 वर्षीय मुलाचे नाव ग्युसेप फिओरेंटीनो आहे. तो लहान असल्यापासून ECOMVERSE | 3CC STUDIOS नावाच्या कन्सल्टिंग एजन्सीचा फाउंडर आहे. त्याला ई-कॉमर्स साइट्सची चांगली समज आहे आणि त्याचा वापर करून त्याने कमी वयात खूप पैसे कमावले आहे, परंतु त्याच्या कुटुंबीयांना याबद्दल काहीच माहिती नाही.
मुलगा कोट्यवधी, पण पालकांना कल्पनाच नाही
ग्युसेपने सांगितलं की त्याचे वडील क्राइममुळे सिसिली या इटालियन शहरातून स्वित्झर्लंडला राहायला गेले. हा मुलगा त्याच्या आई-वडिलांना त्याने कमावलेल्या संपत्तीबद्दल सांगायला घाबरतो कारण त्यांना वाटेल की ही संपत्ती चुकीच्या मार्गांनी कमावली आहे. मुलाने खूप कमी वेळेत ही संपत्ती मिळवली आहे आणि पालकांना ई-कॉमर्सची काहीच समज नाही. त्यांना ऑनलाइन बिझनेसची कल्पना नसल्याने त्यांना खरं सांगितल्यास ते समजू शकणार नाही.
महिन्याला कमवतोय एक कोटी रुपये
ग्युसेपचे इन्स्टाग्रामवर एकूण 50 हजार फॉलोअर्स आहेत आणि तो त्याच्या बिझनेसमधून दर महिन्याला एक कोटी रुपये कमावत आहे. त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत आणि तो दुबई, दक्षिण आफ्रिका आणि इजिप्तमध्ये सुट्ट्या घालवण्यास जातो. तो मुळचा सिसिली इथून आलाय, तिथे बऱ्याच लोकांनी चुकीच्या मार्गांचा वापर करून संपत्ती कमावली आहे. त्यामुळे त्याचे पालकदेखील त्याच्यावर संशय घेतील की त्याने इतके पैसे कमवण्यासाठी काहीतरी चुकीचं काम केलं आहे. आपल्या पालकांपासून दूर जाण्याच्या भीतीने, ग्युसेप त्यांच्यासमोर महागड्या वस्तू वापरत नाही. एवढी संपत्ती असतानाही साधं राहता येणं तसं अवघड काम आहे. नात्यांना महत्त्व देताना ग्युसेप किती काळजी घेत आहे ते यातून दिसतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Property, Viral news