• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ...आणि त्या गावात जिवंत माणसाची निघाली अंत्ययात्रा, धक्कादायक VIDEO

...आणि त्या गावात जिवंत माणसाची निघाली अंत्ययात्रा, धक्कादायक VIDEO

या व्हिडीओतून सध्याचं भयाण वास्तव समोर येत आहे.

 • Share this:
  मध्य प्रदेश, 11 जुलै : शेतकऱ्याचं जगणं काय असतं याचा आपण विचारही करू शकत नाही. सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असणारा शेतकरी कायम कष्ट-मेहनत करीत असतो. निसर्गाची साथ मिळाली तर यश अन्यथा अपयश पचवून तो काम करीतच राहतो. मात्र अनेकदा असा क्षण येतो, जेव्हा चिंतेच सावट घोंगावत आणि रस्ताच सापडत नाही. अशावेळ शेतकरी मिळेत ती पद्धत अवलंबतात. हेतू निसर्गाच्या सोबतीचा असतो. (Farmers worried ) मग अनेकांना ती पद्धत विचित्र किंवा अंधश्रद्धा वाटली तरी अद्यापही आपल्या देशात असे प्रकार सर्रास दिसून येतात. आणि त्यावर गावकऱ्यांचा विश्वासही आहे. असाच एक प्रकार मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) झाबुआमध्ये घडला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशातील झाबुआमध्ये पावसाअभावी लोक त्रस्त झाले आहेत. म्हणून इंद्र देवतेला प्रसन्न करण्यासाठी नवनव्या परंपरा-रुढींचा अवलंब केला जात आहे. याअंतर्गत झाबुआ शहरात जिवंत माणसाची अंत्ययात्रा (Funeral of a living man) काढण्यात आली. इंद्र देवतेला प्रसन्न करण्यासाठी गावकरी अशा विचित्र वाटणाऱ्या पद्धतीचा अवलंब करीत असतात. लोकांचा विश्वास आहे की, या प्रकारामुळे इंद्र देवता प्रसन्न होतील आणि जोरदार पाऊस बरसेल. (Viral Video) हे ही वाचा-धक्कादायक! कोरोनामुळं उपासमारीचं संकटही वाढलं; मिनिटाला 11 जणांचा होतो मृत्यू येथे अशोक नावाच्या तरुणाची अंत्ययात्रा काढण्यात आली. अशोकचं म्हणणं आहे की, जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. जर पाऊस पडला नाही तर बियाणं वाया जातील. अशात लवकरात लवकर पाऊस पडण्याची गरज आहे. जेव्हा पाऊस हुलकावणी देतो तेव्हा गावकरी अशा प्रकारे शवयात्रा काढतात. जिल्ह्यात अद्याप पावसाचा हवा तसा जोर दिसत नाही. गावकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुपार पेरणी करण्याचं संकट ओढवलं आहे. यादरम्यान महागाईही वाढली आहे. अशात दुपार पेरणी करावी लागली तर शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडेल. 
  Published by:Meenal Gangurde
  First published: