ब्राझील, 30 नोव्हेंबर: 77 वर्षांचे आजोबा छोट्या छोट्या मुलांसोबत नर्सरीत जाऊन शिक्षण घेत असल्याची घटना नुकतीच (77 year old goes to nursery with kids to get literate) सोशल मीडियावरून शेअर करण्यात आली आहे. शिक्षणाचं काही वय नसतं, असं म्हणतात. ज्या वयात आपण शिकायला (No age limit for education) सुरुवात करू, तिथून पुढं आपली शैक्षणिक प्रगती होतच राहते. लहान वयात अपूर्ण राहिलेलं शिक्षणाचं स्वप्न हे आजोबा वयाच्या 81 व्या वर्षातही पूर्ण करत आहेत. त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी नर्सरीत (Took admission in Nursery at age of 77) जायला सुरुवात केली.
(Brazil) "My grandfather is 81 years old. At 9, he left school to go work. He always dreamed of reading—at 77 we enrolled him in school. He fulfilled his dream & now dedicates several hours a day to his studies. He taught us to never give up.”🎥rebeca.scspic.twitter.com/ijIF9uF20d
— GoodNewsCorrespondent (@GoodNewsCorres1) November 27, 2021
शिक्षणाचं स्वप्न ब्राझीलमध्ये राहणारे 81 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक दररोज लहान मुलांसोबत शाळेत जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. आजोबा लहान असताना त्यांच्या घरची परिस्थिती गरीबीची होती. त्यामुळे वयाच्या नवव्या वर्षापासूनच त्यांना शाळा सोडावी लागली आणि मिळेल ते काम करून चरितार्थ भागवावा लागला. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता आलं नाही. उतारवयात साकारतायत स्वप्न शालेय वयात अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा चंग या आजोबांनी बांधला असून त्यांनी आता पुनश्च हरिओम करत नर्सरीपासून शाळा शिकायला सुरुवात केली आहे. छोट्या छोट्या मुलांसोबत हे आजोबा दररोज शाळेत जातात आणि बडबडगीतांपासून सगळं काही आनंद लुटत लुटत शिकतात. त्यांचा शिकण्याचा उत्साह मुलांसारखाच ओसंडून वाहत असल्यामुळे मुलांसोबत त्यांची घट्ट मैत्री झाली आहे. हे वाचा- .अन् पठ्ठ्याने थेट पत्नीच्या किडनीचाच केला सौदा; पतीचा प्रताप वाचून व्हाल हैराण नागरिकांकडून होतंय कौतुक या आजोबांचं नागरिकांकडून जोरदार स्वागत होत असून वयाच्या या टप्प्यावर त्यांनी सुरु केलेला उपक्रम हा अनेकांसाठी प्रेरणादायक असल्याच्या प्रतिक्रिया युजर्स देत आहेत. थोड्याशा अपय़शानंतर संघर्ष सोडून देणाऱ्यांसाठी या आजोबांचं उदाहरण प्रेरणादायी असून वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आपण नव्या गोष्टी शिकायला सुरुवात करू शकतो, हाच संदेश आजोबांनी दिला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.