Home /News /viral /

आजीबाई जोरात : गंगा नदी पाहातच हरपलं भान, 70 व्या वर्षी पुलावरून थेट नदीत मारली उडी! VIDEO VIRAL

आजीबाई जोरात : गंगा नदी पाहातच हरपलं भान, 70 व्या वर्षी पुलावरून थेट नदीत मारली उडी! VIDEO VIRAL

सध्या सोशल मीडियावर व्हायरल (70 year old woman viral video ) होतो आहे. या आजी चक्क एका पुलावरून थेट गंगा नदीत उडी मारताना या व्हिडिओमध्ये (Woman jumps into Ganga river) दिसत आहेत

    मुंबई, 1 जुलै : म्हातारपण हे दुसरं बालपणच असतं असं म्हणतात. लहान मुलं ज्याप्रमाणे हट्ट करतात, एखादी गोष्ट नको करू म्हटलं तर तीच आवर्जून करतात;  वृद्ध व्यक्तींचंही तसंच काहीसं वागणं असतं. सध्या एका 70 वर्षांच्या आजींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (70 year old woman viral video ) होतो आहे. या आजी चक्क एका पुलावरून थेट गंगा नदीत उडी मारताना या व्हिडिओमध्ये (Woman jumps into Ganga river) दिसत आहेत. त्यांचा तरुणांनाही लाजवणारा जोश पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये गंगा नदीला (Ganga River) अगदी पवित्र मानलं जातं. गंगेत एकदा अंघोळ केल्याने आपली सगळी पापं धुतली जातात अशी मान्यता आहे. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होत असेल, तर त्यालाही शेवटी गंगाजल पाजलं जातं. हरिद्वारमध्ये गंगा नदीचं पाणी अगदी स्वच्छ आहे. त्यामुळे या ठिकाणी येऊन, देवदर्शन करून मग गंगेत डुबकी (Haridwar elderly woman video) घेण्याला भाविक प्राधान्य देतात. किनाऱ्यावरून गंगा नदीचं पात्र पाहूनच भाविकांच्या शरीरात नवचैतन्य निर्माण होतं. या आजींनी तर गंगेला पाहताच, किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचीही वाट पाहिली नाही. थेट पुलावरूनच (Elderly woman jumps into Ganga) त्यांनी नदीमध्ये उडी मारली. काय आहे व्हिडिओत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की या आजी पुलाच्या बाजूला असलेलं ग्रिल ओलांडून पुढे येतात. एक व्यक्ती त्यांना कुठे उडी मारायची हे सांगते. त्यानंतर त्या पाण्यात उडी (70 year old woman jumps in Ganga river) मारतात. हे सर्व करताना त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे नाही, तर आनंदाचे भाव आहेत. अगदी उत्साहाने त्या नदीत उडी मारतात, आणि आरामात पोहून किनारी पोहोचतात. आजूबाजूचे लोक हे पाहून आश्चर्य आणि कौतुक व्यक्त करत आहेत. 99.99% झाले फेल, पाहुया तुम्हाला जमतंय का; या फोटोत 10 नंबर्स शोधून दाखवा आजीबाई VIRAL या साहसी आजींचा व्हिडिओ एका व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये या आजींचं वय सुमारे 70 वर्षं असल्याचं सांगण्यात आलं आहे. “अम्मा की छलांग” असं कॅप्शन या व्हिडिओला (Ganga river viral video) देण्यात आलं आहे. आतापर्यंत शेकडो लोकांनी या व्हिडिओला रिट्विट केलंय. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
    First published:

    Tags: Ganga river, Viral video on social media

    पुढील बातम्या