जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 99.99% झाले फेल, पाहुया तुम्हाला जमतंय का; या फोटोत 10 नंबर्स शोधून दाखवा

99.99% झाले फेल, पाहुया तुम्हाला जमतंय का; या फोटोत 10 नंबर्स शोधून दाखवा

99.99% झाले फेल, पाहुया तुम्हाला जमतंय का; या फोटोत 10 नंबर्स शोधून दाखवा

जो हे चॅलेंज पूर्ण करेल, त्याची बुद्धिमत्ता नक्कीच सर्वसामान्यांच्या तुलनेत अधिक चांगली असेल.

    मुंबई, 01 जुलै : मानसशास्त्र आणि मेंदूची कार्यपद्धती समजून घेतल्यानंतर, काही चित्रं (Painting) किंवा पॅटर्न (Pattern) अशा प्रकारे तयार केले जातात, की आपल्या डोळ्यांना समोर असलेलं सत्यदेखील दिसत नाही किंवा आपण ते ओळखू शकत नाही. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) असलेलं असंच एक चित्र सध्या इंटरनेटवर व्हायरल (Viral) होत आहे. हे चित्र डिकोड (Decode) करण्याचा अर्थात त्यातलं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करताना अनेकांचं मन अक्षरशः थकून जात आहे. खरं तर इंटरनेटवर नेहमीच ऑप्टिकल इल्युजन असलेली चित्रं, फोटोज शेअर केले जातात. मनोरंजन आणि चाणाक्षपणा जाणून घेणं हे याचे प्रमुख उद्देश असतात. असे फोटो किंवा चित्रं खूप व्हायरल होतात. अनेक जण असं कोडं सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. त्यात काही जण यशस्वी होतात, तर काही जण अयशस्वी. @purpzsaur नावाच्या एका टिकटॉक (TikTok) युझरने शेअर केलेल्या या चित्रात एक विचित्र न्यूमॅरिक पॅटर्न (Numeric Pattern) दिसत आहे. लोकांना या पॅटर्नमध्ये दडलेले एकूण 10 अंक शोधायचे आहेत. जो हे चॅलेंज (Challenge) पूर्ण करेल, त्याची बुद्धिमत्ता नक्कीच सर्वसामान्यांच्या तुलनेत अधिक चांगली असेल. हे वाचा -  कुणाला दिसेल चेहरा, कुणाला झाड; पण या PHOTO मध्ये एक मुलगीही आहे पाहा तुम्हाला सापडतेय का या ऑप्टिकल इल्युजनमध्ये काही न्यूमॅरिक पॅटर्न्स आहेत. त्यातून तुम्हाला 10 अंक शोधून काढायचे आहेत. एकाच फोटोतून 10 अंक शोधणं हे निश्चितच अवघड आहे. बहुतांश व्यक्तींना या फोटोतले 6,8 आणि 4 हे आकडे अगदी सहजपणे दिसले. कारण हे अंक एकमेकांशी जोडलेले आहेत, तर काही बुद्धिमान व्यक्तींना चित्रात 1,2,3,4,6 आणि 8 हे आकडे दिसले.

    News18

    अशा प्रकारची आकड्यांविषयीची चॅलेंजेस इंटरनेटवर नेहमीच व्हायरल होत राहतात. कधी अशा इल्युजनमधून आकडे शोधायला सांगण्यात येतात, तर कधी पॅटर्न्स मोजायला सांगितले जातात. सध्या व्हायरल होत असलेलं हे चॅलेंज वाटतं तितकं सोपं नाही. लोकांना फोटोतले 10 आकडे शोधता येत नसतील, तर ती त्यांची चूक नक्कीच नाही. कारण हे काम खूप ट्रिकी (Triki) आणि अवघड आहे. हे वाचा -  Optical Illusion : तुम्ही ‘या’ फोटोत काय नोटीस केलं?; तुमचं उत्तर म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वातील गुण आम्हाला यात 1 ते 9 आकडे सापडले; पण यात 5 हा अंक दिसत नसल्याचं काही युझर्सनी या पोस्टवर कमेंट करताना म्हटलं आहे. त्याच वेळी काही हुशार व्यक्तींना सर्व 10 अंक सापडले आणि त्यांनी सांगितलं, की हे 1,2,3,4,6,7,8,0 आणि 00 म्हणजे इन्फिनिटी आहेत. तुम्हाला या फोटोत किती आकडे दिसत आहेत?

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात