वॉशिंग्टन, 13 जुलै : आपण तरुण राहावं असं कुणाला वाटणार नाही. त्यासाठी काही लोक किती तरी उपायही करतात. पण तरी वय ते वाढायचं ते वाढतंच. पण तुम्हाला आश्चर्य वाटले, एक डॉक्टर ज्याचं वय चाळीशीवरच थांबलं आहे. या डॉक्टरचं वय चाळीसच्या पुढे एक दिवसही जात नाही आहे. आता हा चमत्कार नेमका कसा झाला हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. डॉ. मार्क हायमन असं त्यांचं नाव. त्यांचा जन्म होऊन 63 वर्षे झाली. म्हणजे त्यांचं वय 63वर्षे आहे. पण त्यांचं शारीरिक वय मात्र 40 वर्षे आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जर त्यांची वैद्यकीय तपासणी झाली, तर त्यांच्या पेशींपासून इतर अवयवांपर्यंत कार्य करण्याची क्षमता 40 वर्षांच्या व्यक्तीइतकीच आहे.
जसजसं वय वाढतं तसतसे काही शारीरिक समस्या, आजार उद्भवतात. काही वेळा एखाद्या व्यक्तीचे वय 30 वर्षे असू शकतं, परंतु जेव्हा त्याच्या हाडांची आणि पेशींची तपासणी केली जाते तेव्हा ते कधीकधी 50 आणि 60 वर्षे वय दर्शवतात. म्हणजे शरीर त्या स्थितीत पोहोचले आहे, जे 60 वर्षांचं आहे. पण डॉ. हायमन यांच्याबाबतीत हे उलटं आहे. ते 63 वर्षांचे आहेत. पण त्यांचं शारीरिक वय 40 वर्षे आहे. वयाच्या 60 व्या वर्षीपर्यंत काही आजार किंवा अशक्तपणाचा सामना करत नाही असा कुणी तुम्ही पाहिला असेल. पण डॉ. हायमन तसेच आहेत. हिरवी झाली जीभ आणि त्यावर आले काळे केस; एका चुकीचा भयानक परिणाम, तुम्हीही तेच करताय डेली मेलच्या रिपोर्टनुसार, डॉ. मार्क हायमन यांचे स्वतःचा अँटी-एजिंग फॉर्म्युला आहे, ज्याचं पालन करून ते शारीरिक वय वास्तविक वयापेक्षा 23 वर्षे मागे ठेवतात. डॉ. हायमन यांनी त्यांचं वय रोखून धरलं आहे. जर आपण डॉ. हायमनच्या दिनचर्येबद्दल बोललो तर त्यांची सकाळची दिनचर्या खूपच कडक आहे. ते सकाळी 6 वाजता उठतात आणि 20 मिनिटं ध्यान करतात. त्यानंतर ते कॉफी पितात आणि त्यांचं काही काम करतात. त्यानंतर व्यायामाची पाळी येते. ते 30 मिनिटांचं स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात, ज्यामध्ये शरीराचे वजन आणि इतर वजन उचलणं समाविष्ट आहे. मग ते स्टीम शॉवर घेतात आणि नंतर थंड शॉवर घेतात. मग प्रोटीन पावडर ब्ल्यूबेरी, झुचीनी आणि चिया बियांनी भरलेले हेल्थ शेक पितात. ते हेल्थी फॅटचं समर्थन करतात आणि म्हणतात की ते शरीर टिकवून ठेवण्यास मदत करते. Viral News: चिमुकल्याच्या पापण्यांमध्ये निघाल्या उवा, प्रकरण पाहून डॉक्टरही चक्रावले आपल्याकडे 180 वर्षे जगायचं आहे. अशा परिस्थितीत त्यांना स्वतःकडे लक्ष द्यावं लागतं, असं ते सांगतात.