जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral News: चिमुकल्याच्या पापण्यांमध्ये निघाल्या उवा, प्रकरण पाहून डॉक्टरही चक्रावले

Viral News: चिमुकल्याच्या पापण्यांमध्ये निघाल्या उवा, प्रकरण पाहून डॉक्टरही चक्रावले

चिमुकल्याच्या पापण्यांमध्ये निघाल्या उवा

चिमुकल्याच्या पापण्यांमध्ये निघाल्या उवा

जगभरात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. आपण विचारही करु शकत नाही अशा विचित्र आणि भयानक गोष्टी सोशल मीडियावर समोर येत असतात. अशातच एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 जुलै: जगभरात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. आपण विचारही करु शकत नाही अशा विचित्र आणि भयानक गोष्टी सोशल मीडियावर समोर येत असतात. अशातच एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे. जी वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल. एक चिमुकल्याच्या पापण्यांमध्ये उवा झाल्याचं समोर आलं. हे प्रकरण पाहून डॉक्टरही चक्रावले. एक 3 वर्षाच्या चिमुकल्याच्या पापण्यांमध्ये उवा झाल्याचं समोर आलं. असं प्रकरण शंभरात एखादं निघतं. त्यामुळे हा प्रकार पाहून डॉक्टरही हैराण झाले. चीनमधून ही घटना समोर आली असून सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

3 वर्षाच्या चिमुकल्याला आपल्या डोळ्यात खूप खाज येत होती. त्याचा डोळाही सुजला होता. त्याच्या पालकांनी त्याला नेत्रतज्ज्ञांकडे नेलं. तिथे डॉक्टरांना जे पहायला मिळालं ते धक्कादायक होतं. मुलाच्या पापण्यांमध्ये त्यांना उवा झाल्याचं आढळलं. हे समोर आल्यावर डॉक्टरही हैराण झाले. ही अत्यंत दुर्मीळ केस होती. न्यूयॉर्क पोस्टनं याबाबात वृत्त दिलं आहे. Viral Video : लाथा बुक्क्या, चप्पल मारत भांडण; लोकल ट्रेनमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मुलाच्या उजव्या डोळ्याच्या पापण्यांच्या मुळाशी सिलिया आणि तपकिरी रंगाचं स्त्राव दिसला. जो डोळ्यांना घट्टपणे चिकटला होता. मुलाच्या डोक्यातल्या उवा डोळ्यापर्यंत आल्याचं आढळून आलं. यामुळे मुलाला डोळ्यात खास येत होती आणि डोळा लाल झाला होता. अशा गोष्टींमुळे डोळाही गमावतो. सुदैवानं या मुलाच्या दृष्टीस काही झालं नव्हतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात