मुंबई, 07 जून: ‘कहने को दादी लेकिन सहेली दादी हो तो ऐसी,’ जीन्स या हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या या ओळी अगदी खऱ्या ठरवेल, अशा एका आजीची सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चा आहे. या महिलेचं वय 53 वर्ष आहे, पण तिचे फोटो पाहिल्यावर तिचा फिटनेस (Fitness) तरुणानांही लाजवत आहे. अँड्रिया सनशाईन (Andrea Sunshinee) नावाची ही महिला फिटनेस फ्रीक आहे. तिला जिमला (Gym) जाणं आणि व्यायाम करणं खूप आवडतं. परिणामी तिची बॉडी पाहून ती महिला 53 वर्षांची आहे, असं सांगितल्यास कोणाचाही विश्वास बसणार नाही. अँड्रियाला सुपरफिट दादी, असंही म्हणतात. 53 वर्षांच्या या आजीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. अँड्रिया सनशाईन नावाच्या या आजीचे फोटो पाहिले तर भलभल्या मॉडेल्स तिच्यासमोर फिक्या पडतील. अनेक अभिनेत्रींना लाजवेल, असं तिचं सौंदर्य (Beauty) आहे. वर्कआउट (Workout) आणि बॉडी बिल्डिंगच्या बाबतीत ती पुरुषांनाही आव्हान देत आहे. या वयातही तिचे 6 पॅक अॅब्स आहेत. अँड्रिया एक प्रोफेशनल बॉडीबिल्डर (Professional body Builder) आणि डच मॉडेल (Dutch model) असल्याचं म्हटलं जातंय.
या सुपरफिट आजीचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. तिची फिट बॉडी आणि सौंदर्य पाहून तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अनेक तरुणांनाही या आजीसोबत डेटवर जावंस वाटतंय. सुपरहिट ‘दादी’ अँड्रियाने स्वतःच याबद्दल माहिती दिलीय. 25 ते 30 वयोगटातील अनेक तरुणांना माझ्यासोबत डेटवर जायचं आहे, असं ती सांगते. टाईम्स नाउ हिंदीने या संदर्भात वृत्त दिलंय. हेही वाचा - आश्चर्य! 21 व्या मजल्यावरून कोसळूनही 55 वर्षांची महिला जिवंत; कसा झाला चमत्कार पाहा अँड्रियाने सांगितलं की, ‘ती दररोज तीन तास वर्कआउट (Workout) करते. मात्र, अनेकदा तिने 8 तास वर्कआउट केला आहे. याशिवाय आहारात ती खूप हेल्दी डाएट (Healthy Diet) घेते. जास्तीत जास्त प्रोटीनचं (Protein) सेवन करते आणि ब्रोकोली आणि हिरव्या भाज्या खाते. एवढंच नाही तर ती मीठ (Salt) आणि तेलाचं (Oil) अजिबात सेवन करत नाही.’ सोशल मीडियावर सुपरफिट आजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अँड्रियाच्या सौंदर्याचं गुपित तिचं हेल्दी डाएट आणि वर्कआउट आहे. अँड्रियाच्या सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवर तिचे खूप फोटो आहेत. त्यावरून ती तिचा बराच वेळ जिममध्ये (Gym) घालवत असल्याचं दिसतंय. सुपरफिट ‘आजी’ अँड्रिया बॉडी बिल्डर असण्यासोबतच सुपर मॉडेल पण आहे, तिचे अनेक बोल्ड फोटो तिच्या अकाउंटवर पाहायला मिळतात. या फोटोंमध्ये ही सुपरफिट दादी म्हणजेच मॉडेल अँड्रिया अतिशय सुंदर दिसत आहे.