Home /News /videsh /

आश्चर्य! 21 व्या मजल्यावरून कोसळूनही 55 वर्षांची महिला जिवंत; कसा झाला चमत्कार पाहा

आश्चर्य! 21 व्या मजल्यावरून कोसळूनही 55 वर्षांची महिला जिवंत; कसा झाला चमत्कार पाहा

Woman survived after fall from 21st floor : 21 व्या मजल्यावरून महिला ज्या कारवर कोसळली त्या कारचा चक्काचूर झाला पण महिलेला काहीच झालं नाही.

    जकार्ता, 07 जून : बिल्डिंगचा 21 वा मजला. जमिनीवरून तिथं पाहिलं तरी चक्कर येते. गदी पाचव्या-सातव्या मजल्यावरून पडूनही मृत्यूचा धोका असतो. मग 21 व्या मजल्यावरून पडल्यानंतर कोणी वाचणं शक्यच नाही. पण एक महिला मात्र 21 व्या मजल्यावरून कोसळूनही बचावली आहे. इतक्या मजल्यावरून कोसळूनही महिलेचा जीव वाचणं म्हणजे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही (Woman survived after fall from 21st floor). इंडोनेशियाच्या केलपा गाडिंगमधील ही घटना आहे.  म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी किंवा काळ आला होता पण वेळ नाही, तेच या महिलेच्या बाबतीत घडलं. इथं राहणारी 55 वर्षांची महिला 21 व्या मजल्यावरून खाली कोसळली. पण तिला काहीच झालं नाही. महिलेने सांगितलं की ती बाल्कनीत कपडे सुकवत होती, तेव्हा तिच्यासोबत ही दुर्घटना घडली. महिला जेव्हा इमारतीवरून कोसळली तेव्हा खाली एक कार पार्किंगमध्ये उभी होती. या कारच्या छतावर ही महिला पडली. दुर्घटनेत कारचा चक्काचूर झाला पण महिला मात्र वाचली. बिल्डिंगवरून कोसळताच ती बेशुद्ध झाली. हे वाचा - Shocking Accident video : डोंगराचा कडा कोसळला, रेलिंग तुटली; कारही दरीत पडणार तोच झाला चमत्कार तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं तिच्या खांद्याचं फक्त एक हाड तुटल्याचं निदान झालं. बाकी तिला दुसरी कोणतीच दुखापत झाली नाही आहे. इतक्या उंचावरून कोसळूनही महिला जिवंत आहे, हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. स्थानिक मीडिया Tribunnews च्या वृत्तानुसार तज्ज्ञांच्या मते, इतक्या उंचावरून पडून महिलेचा जीव वाचणं हा खरंच एक चमत्कार आहे. खाली कोसळल्यानंतरही महिलेला गंभीर दुखापत झाली नाही. रुग्णालायात तपासणीनंतर तिच्या खांद्याचं प्लास्टर करण्यात आलं, त्यानंतर तिला घरी पाठवण्यात आलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Accident, Indonesia, Viral, Viral videos, World news

    पुढील बातम्या