नवी दिल्ली, 06 जून : बऱ्याच लहान मुलांच्या पोटात दुखतं. काही पालक त्याने काही तरी चटरपटर खाल्लं असेल किंवा सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण मुलांच्या
पोटदुखी
कडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. एका प्रकरणात एका मुलाच्या पोटदुखीचं असं धक्कादायक कारण समोर आलं की त्याचे रिपोर्ट पाहून पालकांसह डॉक्टरही शॉक झाले. 5 वर्षांचा हा मुलगा ज्याच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि त्याच्या वैद्यकीय तपासण्याच केल्या. त्याचा मेडिकल रिपोर्ट पाहून सर्वजण हादरलेच. एक्सर-रे रिपोर्टमध्ये त्याच्या पोटदुखीचं धक्कादायक कारण समोर आलं. मुलाच्या पोटात असं काही होतं की कुणी विचारही केला नव्हता. या मुलाच्या पोटात शुगर फ्री च्युइंगगम होतं. तब्बल 40 च्युइंग त्यानं गिळलं होतं. ज्याचा त्याच्या पोटात मोठा गोळा झाला होता आणि तो पोटात चिकटून राहिला होता.
Shocking! एक छोटासा कोळी भारी पडला; तरुणीने आपला ‘तो’ अवयव गमावला
आता हे च्युइंग त्याच्या पोटातून बाहेर काढणंही आव्हानात्मक होतं. डॉक्टरांनी त्याच्या तोंडातून धातूची नळी टाकली आणि त्याच्या मदतीने हे च्युइंगम त्याच्या पोटातून बाहेर काढण्यात आले. अनेक वेळा घशातून चिमटे घातल्याने मुलाला खूप त्रास सहन करावा लागत असल्याच सांगण्यात येत आहे. पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वेदना कमी होताच मूल सामान्य होईल. त्याला फार हानी झालेली नाही.
फोटो - सायन्स डायरेक्ट
पण पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. च्युइंग गिळल्याने काय होतं? अमेरिकेतील फ्लोरिडात प्रॅक्टिस करणारे गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डेव्हिड मिलोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार च्युइंगम खाल्ल्यानंतर थेट छोट्या आतड्यात पोहोचतं आणि तिथून त्यातील नको असलेला भाग शरीराबाहेर टाकला जातो. अर्थात इतर पदार्थांच्या तुलनेत च्युइंगम पचण्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो. Morning Routine : सकाळी पोट साफ होण्यात अडचण येते? मग हे 6 उपाय नक्की ट्राय करा च्युइंगम गिळलं, तर त्याचं पचन होऊन मलावाटे ते बाहेर पडण्याच्या पूर्ण प्रक्रियेला साधारण 7 दिवस लागतात. च्युइंगममधील स्वीटनर, फ्लेवरिंग, प्रिजव्हेटिव्ह आणि सॉफ्टनर यासारखे घटक सहजपणे पचवले जातात. तर यातील गमचा भाग असणारा सिंथेटिक पॉलिमर्सचा बेस शरीर पचवू शकत नाही. त्यामुळे छोट्या आतड्यावाटे तो पदार्थ थेट शरीराबाहेर फेकला जातो.