Home /News /viral /

4 वेळा जुळी, 5 वेळा तिळं अन् 5 वेळा एकाच वेळी 4 मुलं! महिलेनं चाळिशीपर्यंत दिला 44 मुलांना जन्म

4 वेळा जुळी, 5 वेळा तिळं अन् 5 वेळा एकाच वेळी 4 मुलं! महिलेनं चाळिशीपर्यंत दिला 44 मुलांना जन्म

ही महिला वयाच्या 40व्या वर्षापर्यंत तब्बल 44 मुलांची आई बनली आहे. तिचा नवरा (Husband) तिला सोडून गेला असून, ती एकटी मुलांचा सांभाळ करत आहे.

    कंपाला, 25 जून : कोणत्याही महिलेसाठी आई (Mother) होणं निःसंशयपणे आनंददायी अनुभूती असते. परंतु, जेव्हा तुम्हाला युगांडातल्या (Uganda) एका महिलेबद्दल माहिती समजेल, तेव्हा आई होणं तिच्यासाठी अजिबात आनंददायी ठरलं नसावं, असं तुम्ही म्हणाल. आपण ज्या महिलेबाबत बोलत आहोत, ती वयाच्या 40व्या वर्षापर्यंत तब्बल 44 मुलांची आई बनली आहे. तिचा नवरा (Husband) तिला सोडून गेला असून, ती एकटी मुलांचा सांभाळ करत आहे. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. न्यूयॉर्क पोस्ट वेबसाइटच्या वृत्तानुसार, युगांडा येथे राहणारी 43 वर्षांची मरियम नबाटांजी (Maryam Nabatanji) हिला 4 वेळा जुळी मुलं (Twins), 5 वेळा तिळं आणि 5 वेळा एकाच वेळी 4 मुलं झाली आहेत. तिनं तिच्या एका डिलिव्हरीवेळी फक्त एका मुलाला जन्म दिला; मात्र ही गोष्ट केवळ एकदाच घडली. पतीनं केलं पलायन मरियम हिच्या 6 मुलांचा मृत्यू झालेला आहे. तसंच तिचा पती तिला आणि मुलांना सोडून सर्व पैसे घेऊन पळून गेला आहे. सध्या ती तिच्या 38 मुलांसह राहते. मरियम तिची 20 मुलं आणि 18 मुलींचं पालनपोषण एकटीच करते. मरियम 12 वर्षांची असताना कुटुंबीयांनी तिची विक्री करून लग्न लावून दिलं. वयाच्या 13 वर्षी तिनं पहिलं मूल जन्माला घातलं. जेव्हा तिला खूप मुलं झाली, तेव्हा मरियमला वाटलं, की तिच्यात काही तरी दोष आहे आणि ती अन्य स्त्रियांसारखी नाही. अंधश्रद्धेचा कळस; चक्क जीभ कापून केली देवीला अर्पण, मंदिरातच तरुणीसोबत घडलं विपरीत विचित्र परिस्थितीत जन्माला आली अनेक मुलं जेव्हा एकाच वेळी 2, 3 आणि 4 मुलं जन्माला येऊ लागली, तेव्हा मरियम काळजीत पडली आणि डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तपासणी केली असता, शारीरिक स्थिती विचित्र असल्यानं तिला एकाच वेळी अनेक मुलं होत असल्याचं आढळून आलं. डॉक्टरांनी सांगितलं, की `ती अत्यंत प्रजननक्षम (Fertile) आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे तिचं अंडाशय (Ovary) इतर महिलांच्या तुलनेत असामान्य आणि मोठं आहे. या स्थितीला हायपर ओव्ह्युलेशन (Hyper ovulation) असं म्हणतात. या महिलेसाठी जन्म नियंत्रण पद्धती अर्थात बर्थ कंट्रोल उपाययोजना प्रभावी ठरणार नाहीत. उलटपक्षी यामुळे तिला इतर समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.` युगांडाची राजधानी कंपाला इथल्या मुलागो रुग्णालयाचे डॉक्टर चार्ल्स किंगुडू म्हणाले, `आनुवांशिकता (Heredity) हे या स्थितीचं कारण आहे. तिचं अंडाशय एकाच वेळी अनेक बीजांडं रिलीज करतं. यामुळे एकाच वेळी अनेक मुलं होण्याची शक्यता वाढते.` तिनं 3 वर्षांपूर्वी शेवटच्या मुलाला जन्म दिला होता. तेव्हापासून डॉक्टरांनी तिला यापुढे मूल जन्माला घालण्यास सक्त मनाई केली आहे.
    First published:

    Tags: Birth rate

    पुढील बातम्या