लंडन 08 मार्च : अवघ्या तीन वर्षांचं मूल, ज्याला स्वतःला सांभाळण्याची अक्कल नसते. पण याच वयाच्या चिमुकल्याने चक्क आपल्या लहान भावाचा जीव वाचवला आहे. खेळता खेळता त्याला त्याच्या लहान भावाच्या तोंडात मृत्यू दिसला. त्यावेळी त्याच्या आईचंही लक्ष नव्हतं. पण मुलाने ओरडून आईला सांगण्यात बिलकुल वेळ घालवला नाही. त्याने स्वतःच आपल्या भावाचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. तसे लहान मुलांचे, भांवंडांचे व्हिडीओ तुम्ही बरेच पाहिले असतील. सामान्यपणे भावंडं खेळताना, मस्ती करताना, एकमेकांशी भांडताना दिसताच. मला मारलं, मला खाऊ देत नाही, मला खेळायला घेत नाही, अशी तक्रार या भावंडांची एकमेकांविरोधात असते. त्यात खेळताना कुणी पडलं, त्याला काही झालं तर आपल्याला ओरडा पडेल या भीतीने दुसरं भावंडं तिथून धूम ठोकतो. पण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतील फक्त ३ वर्षांच्या चिमुकल्याने तो खरंच मोठा भाऊ आहे हे सिद्ध करून दाखवलं आहे. नियतीचा अजब खेळ! एकाच वेळी 4 बाळांना जन्म देऊनही मिळालं आई होण्याचं सुख; रिकामी राहिली कूस व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन लहान मुलं दिसत आहे. एक बाळ आणि त्याचा मोठा भाऊ जो त्याच्यापेक्षा वयाने मोठा आहे पण तसा तो छोटाच आहे. लहान बाळ कॅमेऱ्यासमोर येतं. त्याच्या हातात आणि तोंडात काहीतरी आहे. सुरुवातीला आपल्यालाही तो काहीतरी खातो आहे असं दिसतं. थोड्यावेळाने त्याचा भाऊ त्याच्याजवळ येतो. त्याच्यासोबत लाडाने हसतो. तेव्हा त्याला तोंडात काहीतरी असल्याचा दिसतं. तो क्षणाचाही विलंब न करता त्याच्या तोंडात आपले चिमुकले हात टाकतो आणि त्याच्या तोंडात जे काही आहे ते बाहेर काढतो.
तुम्ही पाहिलं तर त्या चिमुकल्याच्या तोंडात कोणता पदार्थ नव्हे तर चक्क एक छोटंसं खेळणं होतं. जर या भावाने ते त्याच्या तोंडातून बाहेर काढलं नसतं तर ते तोंडाच्या आत गेलं असतं आणि घशात अडकून चिमुकल्याचा कदाचित श्वास कोंडून मृत्यूही झाला असता. पण सुदैवाने मोठ्या भावाने तसं काही होऊ दिलं नाही. त्यानंतर या मुलाने आपल्या आईला सांगितलं तेव्हा त्याची आई तिथंच मागे होती. आई बोलत नाही म्हणून वडिलांच्या मित्रांना केला फोन; 2 दिवसांनी 14 वर्षीय लेकाला समजलं ती… व्हिडीओ पाहिल्यानंतर मुलाचं सर्वजण कौतुक करत आहेत. हा मुलगा खूप चांगला पालक बनले. या मुलाने खरंच मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडली, असं सर्वजण म्हणत आहेत. तर काही जणांनी त्यांच्या पालकांनाही सुनावलं आहे.
Handled that without breaking a sweat 😮 pic.twitter.com/FNlF4Fb7ZB
— chris evans (@notcapnamerica) March 6, 2023
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं? तुम्ही किंवा तुमच्या भांवडांनी एकमेकांसाठी असं कधी काही केलं आहे का, तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.