मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कैद्यावर जडला जीव अन् मग काय..! तुरुंगातच उरकला साखरपुडा, 30 वर्षांनी होणार सुटका

कैद्यावर जडला जीव अन् मग काय..! तुरुंगातच उरकला साखरपुडा, 30 वर्षांनी होणार सुटका

फोटो क्रे़डिट - सोशल मीडिया

फोटो क्रे़डिट - सोशल मीडिया

डेलीमेलच्या वृत्तानुसार, ती सोमवारी मिशिगन (यूएसए) येथे व्हिक्टरला भेटण्यासाठी तिच्या मँचेस्टर येथील घरातून पहिल्यांदा गेली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Viralimalai, India
  • Published by:  News18 Desk

प्रेम कुठेही, कोणाशीही आणि कधीही होऊ शकते. असंच अनोख्या प्रेमाचं एक उदाहरण समोर आलं आहे. ब्रिटनमधील एका २६ वर्षीय तरुणी अमेरिकेच्या तुरुंगात बंद असलेल्या कैद्याच्या प्रेमात पडली आहे. अलीकडेच दोघेही पहिल्यांदाच भेटले होते, जिथे हे कपल एकमेकांना किस करताना दिसले होते. दोघांनी अद्याप अधिकृतपणे लग्न केलेले नाही. मात्र, तरीही हे दोघेही एकमेकांना पती-पत्नी मानतात.

ब्रिटनच्या एसेक्स येथे राहणारी नाओमी वाईज (26) ही अमेरिकेतील मिशिगन तुरुंगात बंद असलेल्या व्हिक्टर ओक्वेंडो (31) या कैद्याच्या प्रेमात पडली. दोघांची भेट 'पत्र-मित्र स्‍कीम' अंतर्गत झाली. दोघेही दोन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. बराच वेळ गप्पा मारल्यावर नाओमीने त्याचे टोपणनाव 'अ‍ॅनिमल' ठेवले.

नाओमी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती तिच्या आयुष्याबद्दल खूप मोकळी आहे. 'जेल वाईफ' असल्याने ती सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करत असते. नाओमीने पुढे सांगितले की, आम्ही दोघांनी पूर्ण वेळ हसण्यात आणि एकमेकांना खायला घालण्यात घालवला.

डेलीमेलच्या वृत्तानुसार, ती सोमवारी मिशिगन (यूएसए) येथे व्हिक्टरला भेटण्यासाठी तिच्या मँचेस्टर येथील घरातून पहिल्यांदा गेली होती. नाओमीने सांगितले की, व्हिक्टरने तिला तीन अंगठ्याही भेट दिल्या. यात लग्नाची आणि साखरपुड्याचीही अंगठी आहे.

हेही वाचा - कमी वेळात लहान वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी या पद्धती वापरून पहा

दरम्यान, व्हिक्टरने दोन विरोधी लोकांची हत्या केली होती. यानंतर त्याला अटक करण्यात आली असून तो तुरुंगात आहे. व्हिक्टरला 2034 मध्ये पॅरोल मिळू शकतो. मात्र, त्याच्या गुन्ह्यासाठी तो 2052 पर्यंत तुरुंगात राहू शकतो. व्हिक्टरने त्याच्या शिक्षेची 12 वर्षे तुरुंगात घालवली आहेत. नाओमीने व्हिक्टरची लवकरच सुटका व्हावी, यासाठी याचिका सुरू केली आहे. या याचिकेसाठी आतापर्यंत 26 हजारांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

First published:

Tags: Britain, Love story, USA