जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral News: 25 वर्षीय तरुणाने खाल्ले 150 मोमोज; काहीच वेळात चक्कर येऊन पडला अन् पुन्हा उठलाच नाही

Viral News: 25 वर्षीय तरुणाने खाल्ले 150 मोमोज; काहीच वेळात चक्कर येऊन पडला अन् पुन्हा उठलाच नाही

मोमोज खाल्ल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू (प्रतिकात्मक फोटो)

मोमोज खाल्ल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू (प्रतिकात्मक फोटो)

तरुण मित्रांसह मोमोज खाण्यासाठी पोहोचला आणि त्याने एक एक करून 150 मोमोज खाल्ले. मोमोज खाऊन बाकीचे मित्र निघून गेले अन्..

  • -MIN READ Bihar
  • Last Updated :

पाटणा 15 जुलै : आपल्यातील अनेकांना मोमोज खायला अतिशय आवडतात. मात्र कोणतीही गोष्ट मर्यादेत असलेलीच चांगली. याचा प्रत्यय देणारी एक घटना आता समोर आली आहे. बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील सिहोरवा गावातील रहिवासी असलेला युवक गुरुवारी संध्याकाळी उशिरा मित्रांसोबत सिवान जिल्ह्यातील ग्यानी मोर येथे गेला होता, जिथे त्याने मित्रांसोबत पैज लावून 150 मोमोज खाल्ले. मोमोज खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती ढासळू लागली, त्यानंतर त्याला सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिथेच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मिळालेल्या माहितीनुसार, थावे पोलीस ठाण्याच्या सिहोरवा गावातील रहिवासी विशुन मांझी यांचा 25 वर्षीय मुलगा विपिन कुमार पासवान हा सिवान जिल्ह्यातील ग्यानी मोर येथे मोबाईलचं दुकान चालवत असे. मोबाईल दुरुस्तीचं काम तो करायचा. धक्कादायक! रात्री लाईट नव्हती म्हणून दिवा लावला अन् घात झाला; वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू दरम्यान काही मित्र विपिन कुमार पासवान याच्याकडे आले आणि त्यांनी मोमोज खाण्याची पैज लावली. तरुण मित्रांसह मोमोज खाण्यासाठी पोहोचला आणि त्याने एक एक करून 150 मोमोज खाल्ले. मोमोज खाऊन बाकीचे मित्र निघून गेले. विपिन कुमार पासवान देखील मोमोज खाल्ल्यानंतर त्याच्या दुकानात गेला, तेथे काही वेळाने तो बेशुद्ध पडला. विपिन कुमार पासवानला बेशुद्ध अवस्थेत पाहून नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी गोपालगंज सदर रुग्णालयात नेलं. मात्र तिथेच उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वडिलांनी अशी शंका वर्तवली आहे, की त्यांच्या मुलाला विष देऊन त्याची हत्या करण्यात आली आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर गावकरी मृतदेह घेऊन सिवान जिल्ह्यातील बधरिया येथे पोहोचले. मात्र सिवान जिल्ह्यातील बधरिया पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी प्रकरण गोपालगंज येथील असल्याचं सांगत ते थावे इथे पाठवलं. त्यानंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून नंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलीस स्टेशनचे अध्यक्ष शशी रंजन कुमार यांनी सांगितलं की, पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात