नवी दिल्ली, 20 जुलै : जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्याची बरीच प्रकरणं गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. आजही हैदराबादमध्ये एका जिममध्ये व्यायाम करताना एका पोलिसाचा मृत्यू झाला. त्याला हार्ट अटॅक आल्याचं निदान झालं. आता जिमममधील मृत्यूचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. मात्र यामागील कारण धक्कादायक आहे.
दिल्लीतील ही घटना आहे. सक्षम नावाचा 24 वर्षांचा मुलगा ज्याचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला आहे. आता जिममध्ये मृत्यू म्हटला की अनेकांना हार्ट अटॅकच आला असावा असं वाटतं. कारण अशीच प्रकरणं अनेकदा समोर येतात. पण या प्रकरणात मात्र वेगळंच कारण होतं. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, धक्कादायक कारण समोर आलं.
सीसीटीव्हीमध्ये सक्षमच्या मृत्यूचं कारण कैद झालं होतं. सक्षमचे वडील महेश कुमार यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, माझा मुलगा सक्षम मल्टिनॅशनल कंपनीत इंजिनीआर होता. तो दररोज सकाळी जिमला जायचा. गेली 4-5 महिने तो जिमला जात होता. त्यादिवशी मला सकाळी जिममधून फोन आला की सक्षम बेशुद्ध होऊन पडला आहे. आम्ही त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण त्याचा मृत्यू झाला होता.
दोन व्यक्तींनी मला सक्षमला विजेचा शॉक लागला असावा असं म्हटलं. आम्ही पोलिसांना याबाबत सांगितलं. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. जिममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात सक्षम ट्रेडमिलवर व्यायाम करत असल्याचं दिसलं. मशीनमधून करंट येत होता. विजेच्या धक्क्यानेच सक्षमचा मृत्यू झाला हे यावरून स्पष्ट झालं.
Delhi | A 24-year-old man, identified as Saksham died due to electrocution while using a treadmill at a gym in Sector 15 Rohini on 18th July. Case registered. During the investigation, alleged person apprehended in the case. Further investigation is underway: Delhi Police
— ANI (@ANI) July 20, 2023
सक्षमच्या वडिलांनी जिम मालकाला अटक करण्याची आणि त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विजेचा शॉक लागल्यावर काय करायचं? ज्या माणसाला शॉक बसला आहे तो जर अजूनही विजेच्या संपर्कात असेल तर त्याला अजिबात स्पर्श करायला जाऊ नका. त्या व्यक्तीस हात लावण्याआधी वीज बंद करा. ते शक्य नसेल तर एका जाड आणि कोरड्या दोरखंडाच्या सहय्याने त्या व्यक्तीला ओढून घ्या. Viral Video: श्वानाने दिला व्यक्तीला CPR; छातीवर उडी घेत जीव वाचवण्याचा प्रयत्न, पाहून व्हाल अवाक व्यक्तीचा श्वास चालू असल्यास तिला विशिष्ट स्थितीत झोपवा. श्वास थांबला असल्यास छाती चोळा आणि कृत्रिम श्वसन द्या. इतर काही दुसऱ्या प्रकारे श्वास देण्यापेक्षा तोंडावाटे श्वास देणं सामान्य प्रकार आहे. डॉक्टरांना बोलवा.