जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : 'तू आवडलीस, किती पैसे घेशील...', विचारल्यावर पाहा पुढे काय घडलं?

VIDEO : 'तू आवडलीस, किती पैसे घेशील...', विचारल्यावर पाहा पुढे काय घडलं?

VIDEO : 'तू आवडलीस, किती पैसे घेशील...', विचारल्यावर पाहा पुढे काय घडलं?

मला तुझी सोबत हवी आहे. तर त्याला एम्मा म्हणाली की, ती त्याला ओळखत नाही. यावर ती व्यक्ती म्हणाली, पण मी तुला पहिल्यांदा पाहिलं आहे आणि तु मला आवडायला लागली आहे.

  • -MIN READ Viralimalai,Pudukkottai,Tamil Nadu
  • Last Updated :

एका 22 वर्षीय तरुणीचा संध्याकाळी रस्त्यात पाठलाग करून तिला सोबत घेण्याची ऑफर दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुलीला पाहताच अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून उतरला आणि तिचा पाठलाग करू लागला होता. तसेच त्याच्यासोबत येण्यासाठी तिला पैशाचीही ऑफर देत होता. मात्र, तरुणीने त्याला नकर दिल्यावर तो तिच्या मागे पडतो. एका तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. आतपर्यंत या व्हिडिओला 23 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. ही घटना ब्रिटन मधील आहे. 22 वर्षीय एम्मा ग्रेसन ही कार्डिफ रोडवरून जात होती. मात्र, यादरम्यान एक व्यक्ती तिच्या मागे पडला. तब्बल 10 मिनिटे तो एम्माला फॉलो करत राहिला आणि अश्लील कमेंट करत राहिला. तिने या घटनेचे वर्णन भयावह, या शब्दात केले आहे. एम्माने टिकटॉकवर सुमारे 1 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केला. कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, No means NO. या व्हिडिओला २ लाखांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. हेही वाचा -  VIDEO - आधी निमूटपणे मार खाल्ला नंतर घेतला खतरनाक बदला; छळणाऱ्या तरुणाला गाढवाने दिली भयानक शिक्षा व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एम्माला म्हणतो की, मला तुझी सोबत हवी आहे. तर त्याला एम्मा म्हणाली की, ती त्याला ओळखत नाही. यावर ती व्यक्ती म्हणाली, पण मी तुला पहिल्यांदा पाहिलं आहे आणि तु मला आवडायला लागली आहे. तो पुढे म्हणतो, मी तुला आवडलो नाही का? मी तुला सोडून देऊ का? ऐक, माझ्याकडे खूप पैसे आहेत. एम्माने दुसऱ्यांदा सांगितले की, ती इंटरेस्टेड नाहीए आणि ती रिलेशनशिपमध्ये आहे. त्या माणसाने उत्तर दिले, पण तू खूप सुंदर आहेस. मला तुझ्यासोबत राहायचे आहे. तुला किती पैसे हवे आहेत?

जाहिरात

या प्रकरणाबाबत Walesonline सोबत केलेल्या संभाषणात ती म्हणाली की, ती तिच्या मित्राला भेटणार होती. यादरम्यान सुमारे 40 वर्षांचा एक व्यक्ती त्यांच्याकडे आला. ती व्यक्ती तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, ती त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करून वेगाने पुढे जात होती. एम्मा म्हणाली की, महिलांच्या छेडछाडीवरील चर्चेसाठी ही व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तिने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली त्याबद्दल अनेकांनी तिच्यावर हल्ला देखील केला. काही लोकांनी माझ्या पेहरावावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माझ्या केसांशी खेळण्याचा आणि त्या व्यक्तीसोबत फ्लर्ट केल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात