मुंबई, 21 जुलै : काही लोकांना मुक्या जीवांना त्रास देण्यात खूप मजा वाटतो. कधी शेपटी खेच, कधी कान खेच, त्यांना दोरी किंवा पट्ट्याने बांधून ओढत नेणं, चपलेने मारणं असे एक ना दोन प्राण्यांच्या छळाचे किती तरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका तरुणाने गाढवाला मारहाण केली आहे. पण गाढवानेही छळ करणाऱ्या या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे. गाढव म्हणजे मूर्ख प्राणी असेच अनेक जण म्हणतात. तो शांत आणि कमजोर म्हणून काहीच करू शकत नाही, असंच अनेकांना वाटलं. या तरुणाचाही तसाच समज झाला. म्हणून गाढवासारख्या मुक्या जीवाशी पंगा घेण्याची हिंमत त्याने केली. पण माणूस असो वा मुका जीव काहीही सहन करण्याची एक मर्यादा असते. सहनशीलतेचा संयम संपला की काय होईल सांगूच शकत नाही. असंच या व्हिडीओत घडलं आहे. व्हिडीओत पाहू शकता एक गाढव आणि एक तरुण दिसतो आहे. गाढव शांत उभं आहे. तरुण त्याला मारहाण करतो आहे. त्याच्या तोंडावर सटासट हाताने मारत जातो. त्याच्या शरीरावर लाथाबुक्क्या मारतो. शरीरात जितकी ताकद, जोर आहे तितकी सर्व लावून तो या गाढवाला मारतो. कपडे धुवावेत तसं तो गाढवाला धुताना दिसतो. गाढव बिच्चारं शांत, निमूटपणे मार सहन करत असतो त्याची दया येते. व्हिडीओ पाहून आपलाही संताप होतो. हे वाचा - Girl child kissing snake : Shocking! खतरनाक सापाला किस करायला गेली चिमुकली आणि…; अंगावर काटा आणणारा VIDEO तरुण गाढवाच्या सहनशीलतेचा अंत पाहत राहिला आणि गाढवाचा संयम सुटून त्यानेही आपलं रौद्र रूप दाखवलं. गाढवाने ऑन द स्पॉट त्याला भयंकर शिक्षा दिली आहे.
व्हिडीओच्या शेवटी पाहाल तर गाढवाने तरुणाचा पाय आपल्या तोंडात पकडला आहे आणि त्याला तरुणाला खेचताना दिसतो आहे. दगड असलेल्या जमिनीवर तो त्याला गरागरा फिरवतो. तरुण आपला जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसतो. आपल्यासोबत झालेल्या अन्यायाचा गाढवाने खतरनाक बदला घेतला. हे वाचा - कलिंगडासारखा फुलला चेहरा, नजरेतही होती आक्रमकता; डॉक्टरने सांगितलं पाळीव श्वानाबाबत खतरनाक सत्य @javroar ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सुरुवातीला व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी जितका संताप व्यक्त केला तितकाच आनंद त्यांना व्हिडीओचा शेवट पाहून झाला आहे. कारण छळ करणाऱ्या या हैवानाला गाढवाने चांगलीच अद्दल घडवली आहे. जर गाढवाच्या जागी आपण असतो तर आपणही त्याच्यासोबत तेच केलं असतं, अशी प्रतिक्रिया बहुतेक युझर्सनी दिली आहे.