Home /News /viral /

77 वर्षीय वृद्धाच्या प्रेमात पडली 20 वर्षीय तरुणी; खोटं बोलून सुरू झालेलं नातं आता पोहोचलं या वळणावर

77 वर्षीय वृद्धाच्या प्रेमात पडली 20 वर्षीय तरुणी; खोटं बोलून सुरू झालेलं नातं आता पोहोचलं या वळणावर

Unique Love Story: म्यानमारमध्ये राहणारी 20 वर्षीय जो ही एक विद्यार्थीनी आहे तर तिचा 77 वर्षीय प्रियकर डेविड इंग्लंडमध्ये म्यूजिक प्रोड्यूसर आहे

    नवी दिल्ली 05 डिसेंबर : प्रेम (Love) हे आंधळं असतं असं म्हटलं जातं. प्रेमात वय, दिसणं, किंवा इतर कोणत्याही गोष्टींना अधिक महत्तव दिलं जात नाही. प्रेमात वय, अंतर, जात, धर्म अशा सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवल्या जातात. जेव्हा दोन लोक एकमेकांवर प्रेम करू लागतात तेव्हा ते फक्त एकमेकांचं मन बघतात. असंच काहीसं म्यानमारच्या एका 20 वर्षीय तरुणीसोबतही झालं. तिचं एखाद्या तरुणावर नाही तर 77 वर्षाच्या व्यक्तीवर प्रेम जडलं आहे जो तिच्यापासून खूप दूर राहतो. द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, म्यानमारमध्ये राहणारी 20 वर्षीय जो ही एक विद्यार्थीनी आहे तर तिचा 77 वर्षीय प्रियकर डेविड इंग्लंडमध्ये म्यूजिक प्रोड्यूसर आहे (Myanmar Woman Loves England Man). दोघंही १८ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत (Young Girl Dating Old Man). मात्र आपण प्रेयसी-प्रियकर नसून चांगले मित्र आणि आयुष्यभराचा जोडीदार असल्याचं दोघंही सांगतात. म्यानमारमधील सध्याची परिस्थिती आणि कोरोना महामारीमुळे दोघंही सध्या एकमेकांपासून दूर राहतात. जो आणि डेविड यांची भेट एका डेटिंग साईटवर 18 महिन्यांआधी झाली होती. जो एका मेंटरच्या शोधात होती, जो तिची साथ देईल आणि तिच्या अभ्यासासाठी आर्थिक मदत करेल. तर डेविड फ्लर्टिंग करण्यासाठी साईटवर येत असे. डेविडने सांगितलं की ते नेहमीच स्वतःला तरुण समजतात त्यामुळे कमी वयाच्या महिलांसोबत संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा होती. अशात जो हिनेही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये यूकेमध्ये शिकत असल्याचं सांगितलं होतं, मात्र ती राहात म्यानमारमध्येच होती. परंतु ब्रिटेनमध्ये स्वतःसाठी पार्टनर शोधण्याकरता तिने हे खोटं बोललं. जो आणि डेविड यांनी आधी भरपूर अॅडल्ट गप्पा मारल्या. यानंत हळूहळू दोघं इमोशनलीही एकमेकांच्या जवळ आले. तेव्हा जो हिने सांगितलं की ती म्यानमारमध्येच राहते. मात्र डेविडला याने काहीही फरक पडला नाही. आता डेविडला आनंद हा की तो जोचा मेंटर बनवण्यासोबतच लाईफ पार्टनरही बनणार आहे. दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला आहे. आता जोला पासपोर्ट आणि व्हिजा मिळताच तो ब्रिटनला जाणार असून तिथेच दोघंही लग्न करणार आहेत. दोघांनाही आपल्यात असलेल्या 57 वर्षाच्या अंतराचा काहीही फरक पडत नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Love story, Online dating

    पुढील बातम्या