जाहिरात
मराठी बातम्या / Viral / महाकाय अजगरानं बकरीच्या पिल्लाला आवळलं अन्...! पाहून गावकऱ्यांनाही घाम फुटला

महाकाय अजगरानं बकरीच्या पिल्लाला आवळलं अन्...! पाहून गावकऱ्यांनाही घाम फुटला

महाकाय अजगरानं बकरीच्या पिल्लाला आवळलं अन्...! पाहून गावकऱ्यांनाही घाम फुटला

महाकाय अजगरानं बकरीच्या पिल्लाला आवळलं अन्...! पाहून गावकऱ्यांनाही घाम फुटला

शिवपुरीमध्ये तब्बल 20 ते 21 फूट लांबीच्या अजगराने एकच खळबळ उडवली. बकरीच्या पिल्लाला वेटोळे घालून बसलेल्या या भयानक अजगराला पाहून गावकऱ्यांनाही चांगलाच घाम फुटला.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

शिवपुरी, 3 जून : मध्यप्रदेशच्या शिवपुरीमध्ये तब्बल 20 ते 21 फूट लांबीच्या अजगराने एकच खळबळ उडवली. बकरीच्या पिल्लाला वेटोळे घालून बसलेल्या या भयानक अजगराला पाहून गावकऱ्यांनाही चांगलाच घाम फुटला. त्यांनी ताबडतोब याबाबत सर्पमित्रांना माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र सलमान पठान यांनी दीड तास झुंज देऊन अजगराला पकडलं. हा अजगर 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना सहज गिळू शकतो, असं त्यांनी सांगितलं. हे ऐकून गावकऱ्यांनी आपण वाचलो म्हणून एक सुटकेचा निःश्वास सोडला आणि पठाण यांनी अजगराला सुखरूप जंगलात सोडलं. परंतु बकरीच्या पिल्लाने मात्र अजगराच्या वेटोळ्यात आपला जीव गमवला. शिवपुरी जिल्ह्यातील नरवर जनपद पंचायत क्षेत्रात असलेल्या पहाडी गावात जंगलातून आलेला एक भलामोठा अजगर घुसला. एक बकरीचं पिल्लू त्याच्या तावडीत सापडलं. त्याने त्याच्यावर  झडप घालून त्याला जोरात आवळलं. बकरीचं पिल्लू जीव वाचवण्यासाठी धडपडत होतं पण अजगराने त्याला घट्ट धरलं होतं. तो गिळण्यासाठी त्याच्या मरणाची वाट बघत होता. हा भयानक थरार गावकऱ्यांनी पाहिला आणि त्यांना जणू थरकाप भरला. आत्म्यांना मुक्ती मिळायलाचं हवी! स्मशानात कीर्तन करते ‘ही’ बाई वेटोळ्यात पिल्लाचा जीव जाईल किंवा त्याला सोडून अजगर आपल्यावरच झडप घालेल, अशी त्यांना भीती वाटली. तेवढ्यात एका सतर्क गावकऱ्याने सर्पमित्रांना फोन करून याबाबत माहिती दिली. परंतु सर्पमित्र येईपर्यंत पिल्लाने जीव सोडला होता. त्यानंतर दीड तास पकडण्याचा प्रयत्न करून सलमान पठाण यांनी अखेर अजगराला त्याब्यात घेतलं आणि जंगलात नेऊन सोडलं. गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले पण तरीही गावात एक भयाण शांतता पसरली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात