जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आत्म्यांना मुक्ती मिळायलाचं हवी! स्मशानात कीर्तन करते 'ही' बाई

आत्म्यांना मुक्ती मिळायलाचं हवी! स्मशानात कीर्तन करते 'ही' बाई

आत्म्यांना मुक्ती मिळायलाचं हवी! स्मशानात कीर्तन करते 'ही' बाई

आत्म्यांना मुक्ती मिळायलाचं हवी! स्मशानात कीर्तन करते 'ही' बाई

आपण स्मशानात केवळ नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराला जातो, त्याशिवाय कधी सहज स्मशानात जाऊया असा विचारही आपल्या मनात येत नाही. मात्र राजस्थानात एक अशी बाई आहे जी एकटीच स्मशानात जाते आणि तिथल्या आत्म्यांना शांती देते. त्यासाठी स्मशानातच भजन-कीर्तनही करते.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

रवी पायक, प्रतिनिधी भीलवाडा, 3 जून : ‘स्मशान’ असं नुसतं ऐकलं जरी तरी आपल्या मनात क्षणभर भीती येते. आपण स्मशानात केवळ नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराला जातो, त्याशिवाय कधी सहज स्मशानात जाऊया असा विचारही आपल्या मनात येत नाही. मात्र राजस्थानात एक अशी बाई आहे जी एकटीच स्मशानात जाते आणि तिथल्या आत्म्यांना शांती देते. त्यासाठी स्मशानातच भजन-कीर्तनही करते. वाचून अंगावर काटा आला ना? पण हे खरं आहे. राजविंदर कौर उर्फ कारला दीदी असं या महिलेचं नाव आहे. 2019 पासून त्या आत्म्यांना शांती मिळवून देण्याचं कार्य करत आहेत. कारला दीदी याबाबत म्हणाल्या, ‘एकदा मी प्रचंड दुःखी होते, माझं मन खूप विचलित झालं होतं, खूप वाईट वाटत होतं. तेव्हा चालत चालत अचानक स्मशानात पोहोचले होते. तिथे खूप शांतता होती. बरं वाटत होतं. थोड्या वेळाने तिथे एक कुटुंब मृतदेह घेऊन आलं. त्यांनी मृतदेह ठेवला आणि शांततेत निघून गेले. त्या मृतदेहावर कोणतेही अंत्यसंस्कार झाले नाहीत. मग माझ्या मनात विचार आला, या मृत व्यक्तीच्या किती इच्छा अपूर्ण राहिल्या असतील, त्याची साधी अंत्यसंस्कारांची इच्छाही पूर्ण झाली नाही. कदाचित यामुळेच मृत आत्मा भटकत असतील. परंतु असं होता काम नये, सर्व आत्मांना मुक्ती मिळायलाचं हवी आणि यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे.’ याच विचारातून कारला दीदी यांनी सर्व धर्मीय मृत व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार आणि त्यांच्या मुक्तीसाठी पूजा-अर्चा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तातडीने घरी जाऊन याबाबत आपल्या कुटुंबियांना सांगितलं. मात्र कुटुंबीयांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही, उलट त्यांनी कारला दीदींची चेष्टा केली. परंतु शांती प्रकाश मेहता या व्यक्तीला दीदींचं म्हणणं पटलं आणि त्यांनी त्यांची साथ द्यायचं ठरवलं. त्यानंतर 5 जानेवारी 2019 रोजी भीलवाडाच्या पंचमुखी मोक्ष धाममध्ये त्यांचं पहिलं कीर्तन पार पडलं. गेली 4 वर्ष याठिकाणी त्यांचं भजन-कीर्तन आयोजित करण्यात येतं. यात सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होतात. जे मृतदेह लावारस असतात, ज्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीच नसतं त्यांच्या मुक्तीसाठी कारला दीदी प्रयत्न करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात