मराठी बातम्या /बातम्या /Viral /आहे 19 वर्षांचा, पण दिसतो 9 वर्षांचा! महिलेला धमकी दिल्यामुळे account झालं block

आहे 19 वर्षांचा, पण दिसतो 9 वर्षांचा! महिलेला धमकी दिल्यामुळे account झालं block

वयाने 19 वर्षांचा असणारा (19 year old look like 9 year old) मात्र प्रत्यक्षात 9 वर्षांचा दिसणारा तरुण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वयाने 19 वर्षांचा असणारा (19 year old look like 9 year old) मात्र प्रत्यक्षात 9 वर्षांचा दिसणारा तरुण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वयाने 19 वर्षांचा असणारा (19 year old look like 9 year old) मात्र प्रत्यक्षात 9 वर्षांचा दिसणारा तरुण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

डेगिस्तान, 3 डिसेंबर: वयाने 19 वर्षांचा असणारा (19 year old look like 9 year old) मात्र प्रत्यक्षात 9 वर्षांचा दिसणारा तरुण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जगात अनेकांना उंचीशी (Deceases related to height) संबंधित आजार असतात. यामुळे अनेजण वय वाढूनही उंच होत नाहीत. तर काहीजण इतके बारीक असतात की वयाच्या मानानं त्यांचं (Low weight than height) वजन फारच कमी असतं. असे लोक त्यांच्यातील विशिष्ट कलागुणांनी सतत आपलं लक्ष वेधून घेत असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक तरुण लक्ष वेधून घेत आहे. या तरुणाचं वय आहे 19 वर्षांचं, मात्र तो दिसतो आहे केवळ 9 वर्षांचा.

वय वाढतच नाही

डेगिस्तानमध्ये राहणारा हसबुल्ला मॅगोएमेदोव हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. हसबुल्लाच्या लोकप्रियतेचं कारण आहे त्याचं रुप आणि त्याचं व्यक्तीमत्त्व. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हसबुल्ला हा 19 वर्षांचा आहे, मात्र प्रत्यक्षात तो 9 वर्षांचा दिसतो. त्याला पाहिल्यावर जणू एखादा लहान मुलगाच समोर बसला आहे, असं प्रत्यक्षात वाटतं. जोपर्यंत त्याच्याशी कुणी बातचित करत नाही, तोपर्यंत त्याच्या वयाचा कुणालाच अंदाज येत नाही. मात्र सोशल मीडियावर आपल्या रोखठोक आणि दादागिरीच्या भाषेत हसबुल्ला बोलू लागतो आणि सर्वांनाच आश्चर्य वाटतं.

यामुळे दिसतो लहान

हसबुल्लाच्या शरीरातील ग्रोथ हार्मोन्स वाढत नसल्यामुळे तो लहान दिसत असल्याचं डॉक्टर सांगतात. एखाद्या व्यक्तीचं वय वाढण्याला ग्रोथ हार्मोन्स कारणीभूत असतात. मात्र हसबुल्लाच्या शरीरातील ग्रोथ हार्मोन्स कार्यरत नसल्यामुळे तो मोठा असूनही एखाद्या लहान मुलासारखा दिसतो

हे वाचा-माणसाला भेटला जगातील सर्वात खतरनाक पक्षी, लाथ मारून करतो काम तमाम

इन्स्टाग्रामवर झाला ब्लॉक

हसबुल्लाला इन्स्टाग्रामनं ब्लॉक केलं आहे. त्याचा एक वादग्रस्त व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट झाल्यामुळे त्याला कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. एका महिलेनं हसबुल्लाच्या बहिणीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. तिच्या परवानगीशिवाय हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. या प्रकाराचा हसबुल्लाला प्रचंड राग आला आणि त्याने इन्स्टाग्रामवरून महिलेला जीवे मारण्याची धमकीच देऊन टाकली. जर महिलेनं हा व्हिडिओ काढून टाकला नाही, तर आपण तिला जीवे मारून टाकू, अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

First published:

Tags: Instagram post, Russia, Video viral