जाहिरात
मराठी बातम्या / Viral / म्हणे, '...म्हणून वयाच्या 17 व्या वर्षातच दिला बाळाला जन्म'; आई-आजीच्या प्रेग्नन्सीबाबतही केला धक्कादायक खुलासा

म्हणे, '...म्हणून वयाच्या 17 व्या वर्षातच दिला बाळाला जन्म'; आई-आजीच्या प्रेग्नन्सीबाबतही केला धक्कादायक खुलासा

म्हणे, '...म्हणून वयाच्या 17 व्या वर्षातच दिला बाळाला जन्म'; आई-आजीच्या प्रेग्नन्सीबाबतही केला धक्कादायक खुलासा

17 वर्षांच्या मुलीने प्रेग्नन्सीबाबत काही धक्कादायक खुलासा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 11 मार्च : वय वर्षे 17… ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली अल्पवयीन मुलगी. पण आई होण्यासाठी तिने तरुण होण्याचीही प्रतीक्षा केली नाही. अल्पवयीन वयातच ती मुद्दामहून आई बनली. या वयात प्रेग्नंट होण्याचा तिने निर्णय घेतला आणि एका बाळालाही जन्म दिला. अल्पवयीन मुलीच्या या प्रेग्नन्सीची बातमीने सर्वांनाच धक्का दिला (17 year old girl become mother). आई होणं प्रत्येक महिलेसाठी एक आनंदाचा क्षण असतो. पण तरी ती तितकीच मोठी जबाबदारी असते. त्यामुळे आपण ही जबाबदारी आता घेऊ शकतो याची खात्री झाल्यानंतर महिला प्रेग्नंट होण्याचा निर्णय घेतात. प्रेग्नन्सीला घाबरणाऱ्या काही महिला तर उशिरानेच प्रेग्नंट होण्याचा विचार करतात. पण ही मुलगी वयाच्या 17 व्या वर्षातच प्रेग्नंट झाली (What is right time to become mother). हे वाचा -  Shocking! बाळाला जन्म देताना अचानक बाहेर आले डोळे; प्रसूतीवेळी धक्कादायक प्रकार द सन च्या रिपोर्टनुसार 17 वर्षांची शॅनन (Shannon) या टिकटॉकरने आपल्या टिकटॉक अकाऊंटवर हा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याबाबत काही शॉकिंग खुलासे केले आहेत. तिने सांगितलं, तिच्या आजीने 16 व्या वयात मुलाला जन्म दिला होता. तिची आईने 18 व्या वयात आणि बहीण 19 व्या वयात प्रेग्नंट झाली होती. वयाच्या 21 व्या वर्षाच्या आधीच सर्व महिला आई बनल्या होत्या त्यामुळे त्यांच्या 5 पिढ्या आजही जिवंत आहेत.  तिच्या आईची आई जिचं वय सर्वात जास्त 91 वर्षे आहे. लवकर आई होण्याचा हाच फायदा आहे की मुलांना वयस्कर व्यक्तींची साथही बराच काळ लाभते. हे वाचा -  VIDEO - 9 महिन्यांच्या गर्भवतीने घेतली मोठी रिस्क; असं करतब केलं की झाला रेकॉर्ड शॅननचा हा व्हिडीओ पाहून तिचे हे विचार ऐकून काहींनी तिच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तर काहींनी हे वय प्रेग्नन्सीसाठी योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात