जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चमत्कार! आईच्या प्रेमासमोर यमराजही झुकला; तिने असं काही केलं की 2 तासांत मृत मुलगा पुन्हा जिवंत झाला

चमत्कार! आईच्या प्रेमासमोर यमराजही झुकला; तिने असं काही केलं की 2 तासांत मृत मुलगा पुन्हा जिवंत झाला

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केल पण आई येताच मृत्यूनंतर दोन तासांनी मुलगा पुन्हा जिवंत झाला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 19 एप्रिल : आईने आपल्या मुलाला मृत्यू च्या दारातून परत आणल्याची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. कधी बिबट्या, कधी वाघ अशा खतरनाक प्राण्यांशी झुंज देत किंवा मोठ्या संकटाचा सामना करून आईने आपल्या मुलांना वाचवलं आहे. पण तरी जीवनमृत्यू कुणाच्या हातात नाही. जो जगात आला त्याचा एक दिवस मृत्यू अटळ आहे. पण एका प्रकरणात मात्र आईच्या प्रेमासमोर मृत्यूही हरला आहे. आईने प्रार्थना करताच तिच्या प्रेमासमोर यमराजही झुकला. मृत मुलगा दोन तासांतच पुन्हा अचानक जिवंत झाला. सावित्रीने यमराजाकडून आपला नवरा सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. प्रत्यक्षात हे शक्य नाही हे आपल्याला माहिती आहे. पण अशीच अशक्य अशी चमत्कारिक घटना घडली ती टेक्सासमध्ये. जिथं एका आईने आपल्या मृत जिवाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले आहेत. एका मुलाने आपल्या आईची हाक ऐकली आणि तो पुन्हा जिवंत झाला.  सॅमी बर्को असं या मुलाचं नाव आहे. तो 16 वर्षांचा आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सॅमीचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. तो एका खडकावर चढत असताना त्याचा पाय घसरला. त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्याला सीपीआरही दिला, पण त्याला वाचवता आलं नाही. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 8 नातवंडांच्या आजीला चढला ‘जवानी’चा जोश; उतारवयात नको तेच केलं, झाला मृत्यू तो आता या जगात राहिला नाही, ही दुःखद बातमी त्याच्या पालकांनाही देण्यात आली. ते रडत आपल्या मुलाला शेवटचं पाहण्यासाठी आले. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार  सॅमीची आई म्हणाली, मी त्याच्याशी बोलू लागले. आम्ही त्याच्यावर किती प्रेम करतो हे सांगितलं. आम्ही त्याला वाचवू शकलो नाही, यासाठी  त्याची माफीही मागितली. देवाकडे प्रार्थना करू लागली आणि अचानक माझ्या पतीने त्याच्या शरीरात हालचाल होत असल्याचं पाहिलं. सॅमी मृत होऊन दोन तास झाले होते आण अचानक त्याच्या शरीरात हालचाल झाली, तो श्वास घेऊ लागला. हॅप्पी फोटोमागील भयानक स्टोरी! मृत्यूस कारण ठरला हा एक PHOTO, असं काय घडलं? मृत्यूच्या दोन तासांनंतर मृत सॅमी पुन्हा जिवंत झाला. पण त्याची स्मृती गेली होती. महिनाभराचं त्याला काहीच आठवत नव्हतं. आता हळूहळू त्याची स्मृती परत येत आहे. तो कमजोर आहे पण लवकर बरा होतो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात